मुंबई - Umang 2023: अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार अॅक्शन सीन्स देण्यासाठी ओळखले जातात. हे दोघंही त्यांच्या फिटनेस आणि स्टंटसाठी खूप प्रसिद्ध आहेत. दरम्यान आता हे दोघंही याच कारणामुळं चर्चेत आले आहेत, मात्र अक्षय आणि टायगरचा हा स्टंट कोणत्याही चित्रपट किंवा जाहिरातीसाठी नव्हे तर 'उमंग' या कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे. या दोघांनी या कार्यक्रमात पोलिसांच्या गाडीवर चढून एंट्री केली. मुंबई पोलिसांना समर्पित असलेल्या या कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंग यांच्यासह अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मुंबई पोलिसांचा 'उमंग 2023' हा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित करण्यात आला होता.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा अनोखा अंदाज : 'उमंग 2023' या कार्यक्रमामधील आता अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अक्षय आणि टायगरचा व्हिडिओ हा अनेकांना आवडला आहे. या दोघांनी वेगळ्या स्टाईलमध्ये प्रवेश करून शोमध्ये धुमाकूळ घातला. यादरम्यान अक्षय कुमार हा गर्दीशी शेकहॅन्ड करताना आणि डोके टेकवून नमस्कार करताना दिसला. अक्षय आणि टायगर हे एकत्र रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अजय देवगण, करिना कपूर, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर हे स्टार्स असणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.
अक्षय आणि टायगर वर्कफ्रंट : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अक्षय हा शेवटी 'मिशन रानीगंज' या चित्रपटामध्ये दिसला होता. पुढं तो 'धूम 4', 'स्टार्ट अप','हाऊसफुल्ल 5', 'राउडी राठोड 2', स्काय फोर्स, 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. दुसरीकडं टायगर श्रॉफ हा शेवटी 'गणपथ ' चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला होता. पुढं तो रॅम्बो आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा :