ETV Bharat / entertainment

Bawaal : 'बवाल' या चित्रपटामधील पहिले गाणे प्रदर्शित.... - मिथुन

वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'बवाल' या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे अरिजित सिंग आणि संगीतकार मिथुन यांनी गायले आहे.

Bawaal
बवाल
author img

By

Published : Jul 7, 2023, 3:57 PM IST

मुंबई : वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'बवाल' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातले होते. हा टिझर प्रेक्षकांना फार पसंतीला पडला होता. दरम्यान आता या चित्रपटाचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. 7 जुलै रोजी या चित्रपटातील पहिले गाणे 'तुम्हे कितना प्यार करते' रिलीज झाले आहे. हे गाणे अरिजित सिंग आणि संगीतकार मिथुन यांनी गायले आहे. याशिवाय या गाण्याला संगीत देखील संगीतकार मिथुननेच दिले आहेत. आशिकी २ चित्रपटात मिथुन आणि अरिजित सिंगच्या जोडीने एकामागून एक हिट गाणी दिली होती. 'तुम्हे कितना प्यार करते है'चे सध्या ऑडिओ व्हर्जनमध्ये रिलीज झाले आहे. यामध्ये मिथुन आणि अरिजित सिंग यांचा मधुर आवाज ऐकू येत असून वरुण आणि जान्हवी कपूरचा एक रोमँटिक फोटो पडद्यावर आहे. वरुण आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. दंगल आणि छिछोरे सारखे दमदार चित्रपट करणारे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : नितेश तिवारीचा हा चित्रपट या महिन्यात 21 जुलै रोजी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझोन प्राईम व्हिडिओवर रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट जगातील 200 हून अधिक देशांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. त्याचबरोबर 'बवाल' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रदर्शित होणार आहे. आयफेल टॉवरवर प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे स्क्रीनिंग लवकरच होणार आहे. हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहे.

वर्कफ्रंट : वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर नुकताच त्याचा 'जुग जुग जिओ' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर दिसले होते. त्याचबरोबर आता तो 'भेडिया' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

वर्कफ्रंट : जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, देवरा (NTR 30) आणि 'मिस्टर अँड मिस्टर माही' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शेवटी ती 'मिली' चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा :

  1. Mithun mother passed away : मिथुनचा आई शांतीराणी चक्रवर्ती यांचे निधन
  2. Evelyn Sharma : एव्हलिन शर्माने नवजात मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर केली शेअर...
  3. Project K launching : प्रभासच्या प्रोजेक्ट केचे सॅन दिएगोत होणार लॉन्चिंग, कमल हासनसह दिग्गज लावणार हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.