ETV Bharat / entertainment

Top 5 Horror Movies In Hollywood : प्रेक्षकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 'या' ५ भयानक हॉलिवूड चित्रपट... - ५ भयानक चित्रपट

हॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांची मोठी परंपरा आहे. महत्त्वाचे म्हणजे तिथे हॉरर चित्रपटांना प्रतिष्ठाही आहे. भारताप्रमाणे हॉररपट म्हणजे सरसकट 'बी ग्रेड' असा भेद हॉलिवूडमध्ये होताना दिसत नाही. हेच महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे तिथले दिग्दर्शक हॉररपट बनवण्यासाठी विशेष मेहनत घेतात. आज आम्ही तुम्हाला हॉलिवूडमध्ये बनलेले अशा 5 हॉररपटांविषयी सांगणार आहोत, ज्यांच्यात थरार आहे आणि रिपीट व्हॅल्यूसुद्धा! चला तर मग हॉलिवूडच्या 'टॉप 5' हॉरर चित्रपटांविषयी जाणून घेऊ या.

Top 5 horror movies
टॉप हॉरर चित्रपट
author img

By

Published : Aug 5, 2023, 4:58 PM IST

मुंबई : बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंतच्या चित्रपटांनी जवळजवळ प्रत्येक शैलीत हॉलिवूड चित्रपटाला टक्कर दिली आहे. मात्र हॉरर चित्रपटांच्या बाबतीत हॉलिवूडच्या आसपास फिरकणेही भारतीय भाषांमधल्या चित्रपटांना शक्य झालेले नाही. हॉररपटांच्या बाबतीत हॉलिवूडचे निर्विवाद वर्चस्व आहे. शेवटच्या फ्रेमपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या, रहस्यरंजक, थरार अनेक हॉलिवूडपटांनी तिकीटखिडकीवर तिकीट खिडकीवर बाजी मारली आहे. हॉलिवूडच्या ज्या पाच चित्रपटांविषयी आपण बोलणार आहोत, ते तुमच्या घशाला कोरड आणतील, अंगाचा थरकाप उडवतील. पण चांगली कलाकृती बघितल्याचा अनुभवही देतील.

'द शाइनिंग' चित्रपट : आयएमडीबीच्या रेटिंगनुसार 'द शाइनिंग' चा क्रमांक हॉररपटांच्या यादीत खूप वरचा लागतो. हा चित्रपट १९८० मध्ये रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आज चार दशके उलटून गेल्यानंतरही या चित्रपटाबद्दलची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. 'द शाइनिंग' चित्रपटाला आयएमडीबीने ८.४ रेटिंग दिली आहे. या चित्रपटाची कहाणी एका निर्जन हॉटेलमध्ये राहणाऱ्या कुटुंबाभोवती फिरते. स्टॅनली कुब्रिक दिग्दर्शित या चित्रपटात जॅक निकोल्सन, शेली ड्युव्हल, डॅनी लॉयड आणि स्कॅटमन क्रॉथर यांच्या भूमिका आहेत.

'द एक्‍सोसिस्‍ट' चित्रपट : 'द एक्‍सोसिस्‍ट' हा चित्रपट १९७३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विल्यम फ्रीडकिन यांनी केले आहे. या चित्रपटाच्या कहानीत एका तरुण मुलीच्या शरीरात भूत प्रवेश करतो. त्यानंतर विचित्र घटना घडायला सुरुवात होते. या चित्रपटाला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकनही मिळाले. या चित्रपटामुळे बरेच वाद देखील निर्माण झाले होते. 'द एक्‍सोसिस्‍ट' चित्रपटात एलेन बर्स्टिन, मॅक्स वॉन सिडो, लिंडा ब्लेअर आणि लिझी कोबो यांच्या भूमिका आहेत. 'द एक्‍सोसिस्‍ट' चित्रपटाला आयएमडीबीवर ८.१ची रेटिंग मिळाली आहे.

'द अदर्स' चित्रपट : 'द अदर्स' हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक अलेजांद्रो अमेनाबार आहेत. या चित्रपटामधील स्टारकास्टही दमदार आहे. यात निकोल किडमन, क्रिस्टोफर एक्लेस्टन, फिओनुला फ्लानागन आणि अल्किना मन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'द अदर्स' ही आई आणि तिच्या दोन मुलांची कहाणी आहे. या दोन्ही मुलांना प्रकाशाची समस्या असते. त्यांना प्रकाशाचा खूप त्रास होत असतो, त्यामुळे आई त्यांना घेऊन अतिशय जुन्या आणि गुप्त अंधारात वास्तव्य करते. अचानक अशा काही घटना तिथे घडतात ज्यामुळे काही भयंकर परिस्थिती निर्माण होते.

'द कॉन्ज्यूरिंग' चित्रपट : जेम्स वॅनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'द कॉन्ज्युरिंग' फ्रँचायझीचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची कहानी कॅरोलिन (लिली टेलर) आणि रॉजर पेरॉन (रॉन लिव्हिंगस्टन) यांच्याभोवती फिरते. कॅरोलिन आणि रॉजर त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या फार्महाऊसवर राहतात. त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडायला लागतात. त्यांना वाईट स्वप्ने पडतात. या घटनांचा तपास करण्यासाठी कॅरोलिन अलौकिक तज्ञ एड (पॅट्रिक विल्सन) आणि लॉरेन वॉरेन (वेरा फार्मिगा) यांना कॉल करते. वॉरनला कळते की एक दुष्ट शक्ती पेरॉन कुटुंबाला त्रास देत आहे. या हॉरर चित्रपटाला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट खूप लोकप्रिय आहे.

'द रिंग' चित्रपट : 'द रिंग' हा चित्रपट २००२मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात नाओमी वॉट्स, मार्टिन हेंडरसन, डेव्हिड डॉर्फमन आणि ब्रायन कॉक्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोर व्हर्बिन्स्की दिग्दर्शित, या चित्रपटात एक व्हिडीओ टेप आहे जो एखाद्या व्यक्तीने पाहिला की त्याची सात दिवसांनी मृत्यू होत असते. अनेकजण उत्सुकतेपोटी, हा व्हिडिओ टेप पाहतात आणि त्यानंतर त्यांची खूप विदारक स्थितीत मृत्यू होतो. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.१ रेटिंग मिळाली आहे.

हेही वाचा :

  1. Kangana Ranaut : कंगना रणौतचा हॉरर कॉमेडी 'चंद्रमुखी २'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
  2. Ajay Devgan wishes Kajol : 'तारीफ करुं क्या तेरी...' म्हणत अजय देवगणने काजोलला दिल्या रोमँटिक शुभेच्छा!
  3. kajol devgan : काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर काबीज केली बॉलिवूड चित्रपटसृष्टी....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.