मुंबई - बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा खतरनाक स्टंट ( Tiger Shroff dangerous stunt ) करण्यासाठी प्रसिध्द आहे. त्याची चपळता आणि कठोर मेहनत त्याच्या प्रत्येक स्टंटमध्ये दिसून येते. मात्र अलिकडेच त्याला एक स्टंट करणे महागात पडले आहे. टायगरने इन्स्टाग्रामवर स्वत: व्हिडिओ शेअर करत या दुर्घटनेची माहिती दिली. तो वॉश बेसिन तोडण्याचा प्रयत्न करताना त्याचा पाय मोडला (Tiger Shroff Broke His Leg) आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कसा झाला अपघात? - अभिनेता टायगर श्रॉफ बेसिन तोडण्याचा प्रयत्न सरावादरम्यान करत होता, त्यावेळी हा अपघात घडला. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, काँक्रीट वॉश बेसिन फोडताना माझा पाय मोडला कारण मला उडवले गेले होते आणि मला वाटले की मी आहे त्याहून अधिक बलवान आहे परंतु माझ्याशी लडताना बचाव करत बेसीनसुध्दा तुटले. असे म्हणत त्याने हसतानाचा इमोजी टाकला आहे. मात्र टायगरचा हा व्हिडिओ पाहून चाहते मात्र काळजीत पडले असून चाहते त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
टायगरच्या या अपघातानंतर 'हिरोपंती', 'मुन्ना मायकल' आणि 'बागी' या सिनेमासाठी काम केलेला दिग्दर्शक साबीर खान यानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने म्हटलंय की, ''आम्ही ज्या दिवशी सलग २४ तास शुट केले त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे.'' सामीर खानच्या या प्रतिक्रियेमुळे लक्षात आले की हा जुना व्हिडिओ आहे. त्यामुळे खरंतर टायगरच्या चाहत्यांनी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही.
कामाच्या पातळीवर टायगर श्रॉफ लवकरच 'गणपत' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहे. त्यानंतर तो अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' करत आहे.
हेही वाचा - अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन