ETV Bharat / entertainment

Tiger 3 Trailer OUT : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3'चा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ... - इमरान हाश्मी

Tiger 3 Trailer OUT : सलमान खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण आज बहुप्रतीक्षित चित्रपट 'टायगर 3'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Tiger 3 Trailer OUT
टायगर 3चा ट्रेलर प्रदर्शित
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 2:13 PM IST

Updated : Oct 16, 2023, 2:58 PM IST

मुंबई - Tiger 3 Trailer OUT : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर अ‍ॅक्शन-स्पाय चित्रपट 'टायगर 3'च्या ट्रेलरबद्दल अनेकजण आतुर होते. दरम्यान आज 16 ऑक्टोबर रोजी 'टायगर 3' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सलमान खानचा 2023 मधील हा दुसरा चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकजण या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. यशराज बॅनरखाली बनलेल्या 'टायगर 3'च्या जबरदस्त ट्रेलरमध्ये सलमान, कतरिना आणि इम्रान हाश्मी हे अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. 'टायगर 3' हा चित्रपट 10 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी रविवारी 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानची इम्रानशी स्पर्धा होणार : सोशल मीडियावर सलमान खानच्या लूकपेक्षा इम्रान हाश्मीच्या लूकचीच जास्त चर्चा होऊ लागली आहे. निर्मात्यांनी इम्रान हाश्मीच्या लूकवर खूप चांगला प्रयोग केला आहे. इम्रान हाश्मी त्याच्या वाढत्या हलक्या पांढर्‍या दाढीमुळे किलर दिसत आहे. याशिवाय सलमान खान आपल्या जुन्या अंदाजात दिसत आहे. 'टायगर 3'च्या ट्रेलरमध्ये इम्रान हाश्मीने आपले कुटुंब टायगरमुळे गमावलं आहे, त्यामुळे त्याला आता बदला घ्यायचा आहे, असं दाखवण्यात आलंय. इम्रान हाश्मी ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शननं धुमाकूळ घालताना दिसतो. बहुसंख्य हिंदी चित्रपट शुक्रवार किंवा गुरुवारी प्रदर्शित होतात. 'टायगर 3' मात्र रविवारी, दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'टायगर 3'बद्दल : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या 'टायगर 3' चे दिग्दर्शन मनीष शर्मा​ यांनी केलं आहे. टायगर फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे. 'एक था टायगर' हा पहिला भाग 2012 मध्ये रिलीज झाला होता, ज्याचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. 'टायगर जिंदा है' हा दुसरा भाग हा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते. 'टायगर 3' हा यशराज स्पाय युनिव्हर्सचा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

'टायगर 3'चा ट्रेलर : चित्रपटात इम्रान हाश्मी टायगरला अशा परिस्थितीत आणतो, ज्यामध्ये त्याला एकीकडे आपला देश आणि दुसरीकडे त्याचं यापैकी एकाची निवड करावी लागते. टायगर कोणाची निवड करणार? याचं उत्तर चित्रपटात मिळेल. दरम्यान, आता ट्रेलरमधील इम्रान हाश्मीच्या लूकवर एका यूजरनं लिहिलं की, 'इम्रान हाश्मी खलनायकाच्या लूकमध्ये खूपच मस्त दिसत आहे.' दुसऱ्या यूजरनं लिहिलं , 'जेव्हा इम्रान हाश्मी सलमान खानसमोर येतो, तेव्हा हा सीन गूजबम्प्स देणार आहे.' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'इम्रान हाश्मीचा लूक इतका खतरनाक आहे की, साहजिकच हा चित्रपट रेकॉर्ड तोडणार आहे'. थोडक्यात ट्रेलरवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

हेही वाचा :

  1. Parineeti Chopra : परिणीती चोप्रा हनिमून ऐवजी गेली गर्ल्स ट्रिपवर; फोटो केले शेअर...
  2. Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' च्या ग्रँड प्रीमियरची दमदार सुरुवात, जाणून घ्या कोण आहेत नवे स्पर्धक
  3. Urvashi Rautela Iphone : भारत-पाकिस्तान सामना पाहणं पडलं महागात; उर्वशी रौतेलाचा सोन्याचा 'आयफोन' हरवला

Last Updated : Oct 16, 2023, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.