ETV Bharat / entertainment

'टायगर 3'नं विश्वचषक सामन्याच्या फायनलच्या दिवशी केली 'एवढी' कमाई; जाणून घ्या - इमरान हाश्मी

Tiger 3 Box Office Collection Day 8 : सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांचा 'टायगर 3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करत आहे. मात्र भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023च्या अंतिम सामान्याच्या दिवशी या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असे वाटत असतानाही समाधानकारक कमाई केली आहे.

Tiger 3 Box Office Collection Day 8
टायगर 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 10:34 AM IST

मुंबई - Tiger 3 Box Office Collection Day 8 : सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर 'टायगर 3' दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी करत आहे. एका आठवड्यात 'टायगर 3' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट लवकरच 500 कोटीचा आकडा पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. 'टायगर 3'नं रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजे रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023च्या अंतिम सामान्याच्या दिवशी किती कोटीची कमाई केली हे जाणून घेऊया...

'टायगर 3' नं रिलीजच्या 8 व्या दिवशी किती कमाई केली? : सध्या 'टायगर 3' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 44.5 कोटीचं कलेक्शन केलं. यानंतर दुसऱ्या दिवशी सलमान खानच्या चित्रपटानं 59.25 कोटींची कमाई केली .तिसऱ्या दिवशीही 'टायगर 3'नं 44.3 कोटींचा गल्ला जमावला होता. मात्र चौथ्या दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 21.1 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 18.5 कोटींचा व्यवसाय केला, तर सहाव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 'टायगर 3'चं कलेक्शन 13.25 कोटी रुपये झाले. सातव्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटानं 18.5 कोटींची कमाई केली. आता 'टायगर 3' नं रिलीजच्या आठव्या दिवशी रविवारी 10.25 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 229.65 कोटी झाले आहे.

'टायगर 3'च्या कमाईवर झाला परिणाम : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023चा अंतिम सामाना हा रविवारी होता, त्यामुळं 'टायगर 3नं या दिवशी कमी कमाई केली. शनिवारच्या तुलनेत रविवारी 'टायगर 3'च्या कमाईत लक्षणीय घट पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रेक्षकांना पसंतीला पडला आहे. 'टायगर 3' चित्रपट 300 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनिष शर्मानं केलं आहे. 'टायगर 3'मध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त आशुतोष राणा,रेवती मेनन, रिद्धी डोगरा, रणवीर शौरी, अनुप्रिया गोएंका, कुमुद मिश्रा आणि इतर कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. मन्सूर अली खानच्या वादग्रस्त विधाननंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिलं चोख प्रत्युत्तर
  2. वर्ल्ड कप जिंकला तर कपडे; 'या' अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट
  3. बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्राचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.