ETV Bharat / entertainment

Tiger 3: 'टायगर 3'मधील इमरान हाश्मीचा फर्स्ट लूक आला समोर; पहा पोस्टर... - फर्स्ट लूक प्रदर्शित

Tiger 3: टायगर-3 मधील इम्रान हाश्मीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सोमवारी, निर्मात्यांनी सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता.

Tiger 3
टायगर-3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 4:02 PM IST

Updated : Oct 17, 2023, 5:07 PM IST

मुंबई - Tiger 3 : सलमान खानचा बहुप्रतीक्षित 'टायगर 3' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आता निर्मात्यांनी मंगळवारी इम्रान हाश्मीचा फर्स्ट लुक रिलीज केला. यापूर्वी, निर्मात्यांनी चाहत्यांना आणि प्रेक्षकांना सलमान खान आणि कतरिना कैफची झलक दाखवली होती. 'टायगर 3' या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इम्रान हाश्मीची दमदार एन्ट्री आहे. हा ट्रेलर 2 मिनिटे 51 सेकंदांचा आहे.

इम्रान हाश्मी शेअर फर्स्ट लूक : इम्रान हाश्मीचा लूक प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण त्याचं कौतुक करतायत. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. इम्रान हाश्मीनं त्याच्या इंस्टाग्राम पेजवर लूकची पहिली झलक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, 'आतिशसोबत आतिशबाजी भारी पडणार 'टायगर. (आतिश के साथ आतिशबाजी भारी पडेगा टायगर) 'टायगर 3' चित्रपट 12 नोव्हेंबरला सिनेमागृहात दाखल होईल. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे'. असं त्यानं त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये इम्रान हाश्मी काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. याशिवाय त्याच्या हातात बंदूक आहे.

सलमान खाननं इम्रान हाश्मीचा फर्स्ट लूक केला शेअर : याशिवाय सलमान खाननं देखील इम्रानच्या लूकचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटातील खलनायकाचे पोस्टरही शेअर करत कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'आतिश उर्फ ​​इमरान 'टायगर 3'मध्ये तू आतिशबाजी करणार, अशी शत्रुत्वामध्ये आणखी मजा येईल. इम्रान हाश्मीला आधीच्या चित्रपटांमुळे 'सिरियल किसर' हा टॅग मिळाला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी सलमानला प्रश्न विचारला की, 'इम्रानभाईचा किसिंग सीन आहे का?' आणखी एका युजरनं लिहिलं की, 'इम्रान हाश्मी सलमान खानशी प्रतिस्पर्धी म्हणून बरोबरी करू शकेल का?' अशा अनेक कमेंट सलमानच्या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. Disha patani : दिशा पटानीचा मुंबई विमानतळावरील बोल्ड लूकचा व्हिडिओ झाला व्हायरल ; पहा व्हिडिओ...
  2. Thalapathy Vijay : 'लिओ'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद... मात्र, रिलीजबाबत हायकोर्टात सुनावणी...
  3. Bigg Boss 17 day 1 highlights: विकी जैनवर टीका झाल्यानं अंकिता लोखंडे बिथरली, मन्नारा चोप्राला सापडला नवा दोस्त

Last Updated : Oct 17, 2023, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.