ETV Bharat / entertainment

Arjun Kapoor and salman khan : अर्जुन कपूरनं संपवलं सलमान खानसोबतच कोल्ड वॉर ; 'टायगर 3'चा व्हिडिओ केला लाईक... - मलायका अरोरा

Arjun Kapoor and salman khan : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि सलमान खान हे सध्या चर्चेत आले आहेत. अर्जुनला सलमानचा प्रमोशन करताना व्हिडिओ आवडला आहे. या व्हिडिओमध्ये भाईजान 'टायगर 3'चे प्रमोशन करत आहे.

Arjun Kapoor and salman khan
अर्जुन कपूर आणि सलमान खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 12:47 PM IST

Updated : Oct 12, 2023, 1:44 PM IST

मुंबई - Arjun Kapoor and salman khan : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि सलमान खान हे दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. हे अनेकांना माहीत आहे. काही काळापूर्वी अर्जुन आणि सलमानच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता, मात्र आता दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं दिसून येतंय. दरम्यान आता सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील कोल्ड वॉर संपलंय. सलमान खान त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो 'टायगर 3'च्या प्रमोशनमध्ये गुंतलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या दरम्यान सलमान खान 'टायगर 3'चं प्रमोशन करणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सलमाननं याबद्दल नुकतीच घोषणा केली आहे.

सलमान खान करणार 'टायगर 3'चं प्रमोशन : 'यशराज फिल्म्स'नं आपल्या सोशल मीडिया हँडलवर सलमानचा प्रमोशन व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. दरम्यान आता अर्जुन कपूरला हा व्हिडिओ आवडला आहे. यानंतर अर्जुन आणि सलमानमधील शीतयुद्ध संपल्याचं बोललं जातंय. अर्जुन कपूर सलमान खानबरोबरच्या मतभेदांबद्दल कधीही जाहीरपणे बोलला नाही. अर्जुन कपूरशी मलायका अरोराची वाढती जवळीक सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि मलायकाच्या घटस्फोटाला कारण ठरल्याचं बोललं जातं. त्यानंतर सलमान आणि अर्जुनमधले संबंध दुरावले. अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, अर्जुन आणि सलमानचे संबंध चांगले नाहीत. बोनी कपूर यांनी 2020 मध्ये दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा करत सांगितलं होत की, अर्जुनला कायम दिग्दर्शक बनायचं होतं. त्यामुळेच त्याला हिरो म्हणून लॉन्च करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण एके दिवशी मला सलमानचा फोन आला, त्यानंतर त्यानं मला सांगितलं की अर्जुनला अभिनयक्षेत्रात उतरवा, त्यानंतर अर्जुननं अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे नाते : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या जोडप्यानं 2019 मध्ये आपलं नातं अधिकृत केलं. या दोघांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर 2019 मध्ये 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या एका भागादरम्यान हातात हात घालून दोघे चालले होते.आता बरेचदा हे जोडपं एकत्र दिसतं. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या, त्या अफवाच ठरल्या.

हेही वाचा :

  1. Saba Azad Trolled : रॅम्पवर विचित्र डान्स केल्यानं हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद झाली ट्रोल; व्हिडिओ व्हायरल...
  2. Aparshakti's turning point of life: रेडिओ स्टेशनवरुन बोलवणं आलं आणि अपारशक्ती खुरानाचा आयुष्यच बदललं
  3. Sunny Deol : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेत झळकणार सनी देओल ?

Last Updated : Oct 12, 2023, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.