मुंबई - Tiger 3 New Poster : सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी टायगर आणि झोयाच्या भूमिकेत परतली आहे. 'टायगर 3'बद्दल चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 'टायगर 3'मध्ये सलमान खान पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. 'टायगर 3'चा ट्रेलर हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी कतरिना कैफचा लूक शेअर केला आहे. कतरिनाचा लूक या पोस्टरमध्ये खूप स्टनिंग दिसत आहे. कॅटचा लूक पाहून हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर झाले आहेत.
कतरिना कैफ सोलो लूक रिलीज : सलमान खाननं कतरिनाचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका हातात बंदूक घेऊन गोळ्या झाडताना दिसत आहे. याशिवाय तिनं दुसऱ्या हातानं दोरी पकडली आहे. कतरिनाचा लूक पोस्टर शेअर करताना भाईजाननं लिहलं, 'टायगर 3'चा ट्रेलर 16 ऑक्टोबरला येतोय. 'टायगर 3' दिवाळीला 10 नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे'. सलमान खानच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहलं, ' ट्रेलर येण्यासाठी 6 दिवस बाकी आहेत. टायगर आणि झोया' तर दुसऱ्यानं लिहिलं, सलमान सर, 'टायगर 3' ची प्रतीक्षा आता होत नाही'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.
भाईजानचा संदेश : सलमान खाननं नुकताच 'टायगर 3' मधील त्याचा संदेश शेअर केला होता. यामध्ये त्यानं सांगितले की, 'त्याला देशद्रोही म्हटले गेले आहे आणि तो परत येत आहे'. 'टायगर 3' बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्स अंतर्गत याची निर्मिती केली आहे. यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदी है', वॉर, पठाण आणि आता 'टायगर 3 येतोय. 'टायगर 3'मध्ये सलमान आणि कतरिना व्यतिरिक्त इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील इम्रानचा लूक अद्याप समोर आलेला नाही.
हेही वाचा :