मुंबई - आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. त्यांच्यावर मात करताना प्रेमाच्या 'सरी' बरसल्या की होणाऱ्या कष्टांना ऊर्जा मिळते. अर्थात जीवनात प्रेम असणे गरजेचे असते कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात ते जगणे सुसह्य करते. पावसाळ्यातील सरी देखील आयुष्यात शीतलता आणतात आणि त्यामुळे पर्जन्य ऋतू हा अनेकांसाठी खास असतो. आता ऐन उन्हाळ्यात 'सरी' बरसणार आहेत. म्हणजेच 'सरी' नावाचा चित्रपट येऊ घातलाय ज्याचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.
आयुष्य अनाकलनीय असते. कधी काय घडेल याची कोणालाही पूर्वसूचना नसते आणि म्हणूनच जवळपास प्रत्येकाच्या जीवनात आश्चर्य आणि चमत्कार या गोष्टींना थारा असतो. इंग्रजीत म्हटले आहे की 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स'. ही फिलॉसॉफी घेऊन सरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटायला येत आहे. यात प्रेमाच्या सरी शिंपडल्या जाताहेत तीन जणांवर आणि त्यामुळे चित्रपटात तयार होतो प्रेमाचा त्रिकोण. टिझर मधून याची कल्पना येतेच. यातील नायिका दिया, जी भूमिका साकारलीय रितिका श्रोत्रीने, म्हणते की, 'मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय... आय लव्ह यू...’. परंतु हे ती कोणाला बोलतेय हे मात्र गुपित ठेवण्यात आलंय. तिचे रोहितवर, जी भूमिका साकारलीय अजिंक्य राऊतने, मनापासून प्रेम आहे आणि आदी, जी भूमिका साकारलीय पृथ्वी अंबरने, दिया वर प्रेम करतोय. या त्रिकोणात कोणाचे प्रेम जिंकेल आणि कोणाचे मन दुखावेल याचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर होईल. अर्थात अनेक धक्के आणि आश्चर्याचे झटके खात तो खुलासा होईल हे नक्की. या चित्रपटाद्वारे दोन पदार्पणं होताना दिसतील. पृथ्वी अंबर याचा हा पहिला सिनेमा आहे तर अशोका के. एस. हे मराठी मध्ये दिग्दर्शन पदार्पण करीत आहेत. ते तसे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नावाजलेले नाव आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सरी चित्रपटात प्रमुख भूमिकेत अजिंक्य राऊत आणि रितिका श्रोत्री दिसतील तसेच पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती केली आहे डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल यांनी आणि याची प्रस्तुती केली आहे कॅनरस प्रॉडक्शनने. 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.