ETV Bharat / entertainment

Bhalari song release from Raundal : साहित्यात श्रमगीत म्हणून विशेष दर्जा लाभलेलं भलरी हे रौंदळ चित्रपटातील गाणं प्रदर्शित!

रौंदळ या आगामी मराठी चित्रपटातील भलरी हे नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण बाजाचं श्रमगीत असलेलं हे भलरी गीत बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलं असून, संगीतकार हर्षित-अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. गणेश चांदनशिवे, वैशाली माडे आणि हर्षित-अभिराज यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चांद लावलेत.

Bhalari song release from Raundal
Bhalari song release from Raundal
author img

By

Published : Feb 2, 2023, 3:01 PM IST

मुंबई - सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार म्हणजेच भलरी, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. भलरीला आपल्या साहित्यात श्रमगीत म्हणूनही विशेष दर्जा आहे. हा लोप पावत चाललेला गीतप्रकार रौंदळ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण बाजाचं श्रमगीत भलरी... हे संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. 'घे गड्या घे ....भलरी घे ...भलरी घे ...भलरी घे...' असा या गाण्याचा मुखडा आहे. हे प्रसंगनुरूप गाणं गीतकार व मराठी व्याकरणाचे भीष्म पितामह म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे असे बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलं असून, संगीतकार हर्षित-अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. गणेश चांदनशिवे, वैशाली माडे आणि हर्षित-अभिराज यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चांद लावलेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

देशातील तमाम शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 'रौंदळ'मधील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील हे लोकगीत चित्रपटात पहायला मिळणार आहे. या गाण्याबाबत संगीतकार हर्षित-अभिराज म्हणाले की, दिग्दर्शक गजानन पडोळ यांनी जेव्हा या चित्रपटाच्या कथानकात कथेतील प्रसंगांशी एकरूप होणाऱ्या महाराष्ट्रातील लोकगीताचा समावेश करण्याबाबत चर्चा केली तेव्हा 'भलरी...' या गाण्याची संकल्पना सुचली. गीतकार बाळासाहेब शिंदे यांनी कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारं गीत लिहिलं, हे गाणं जरी ग्रामीण शैलीतील असलं तरी शहरी-निमशहरी प्रेक्षकांनाही भुरळ पाडणार यात शंका नाही . यातील संगीतरचना सर्व वयोगटातील रसिकांच्या मनाला भिडणारी असल्याचंही हर्षित-अभिराज म्हणाले.

ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे 'रौंदळ'मध्ये पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांना भेटायला येत आहे. 'रौंदळ'ची निर्मिती भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी , कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गजानन नाना पडोळ या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय.

भलरी हे रौंदळ चित्रपटातील गाणं प्रदर्शित

भाऊसाहेब शिंदेनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्याच्या साथीला आहे. याखेरीज संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. या चित्रपटासाठी सुधाकर शर्मा, डॅा. विनायक पवार यांनीही गीतलेखन केलं असून, सोनू निगम, जावेद अली, स्वरूप खान, दिव्य कुमार यांनी गायली आहेत. या गाण्यांवर नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी केली असून, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिलं आहे. अनिकेत खंडागळे यांची सिनेमॅटोग्राफी आणि फैझल महाडीक यांचं संकलन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आहे. 'ख्वाडा'साठी राष्ट्रीय पारितोषिकावर नाव कोरणाऱ्या साऊंड डिझायनर महावीर साबन्नावरनं याचं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं आहे.

'रौंदळ' येत्या ३ मार्च २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ आहे.

हेही वाचा - Kiara and Siddharth wedding : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नासाठी जैसलमेरमध्ये आलिशान खोल्या व गाड्या बुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.