ETV Bharat / entertainment

Battalion 50 : 'बटालियन 50'मधून दिसणार सीमेवरील शूरवीरांची गाथा; लवकरच मोठ्या पडद्यावर होणार प्रदर्शित.... - देशभक्तीपर चित्रपट

Battalion 50 : देशभक्तीपर चित्रपट 'बटालियन 50' हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये शूर वीरांची गाथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Battalion 50
बटालियन 50
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 4:09 PM IST

मुंबई - Battalion 50 : देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षक नेहानीच पाठिंबा देताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीतही या विषयावर चित्रपट बनविल्या जाते. दरम्यान आता अशाच एका शुरवीर सैनिकाची गाथा प्रेक्षकांना ‘बटालियन 50’मधून पाहायला मिळणार आहे. यापूर्वी शूर सैनिकांच्या कहाण्या पडद्यावर आपण पाहिल्या आहेत. आता या चित्रपटामध्ये मराठमोळ्या मातीत शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडतात हे दाखवल्या गेले आहे. या चित्रपटाची कहणी अंगावर काटे उभी करणारी आहे. 'बलोच' या ऐतिहासिक देशप्रेमाची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर त्याच 'कीर्ती वराडकर फिल्म्स' निर्मितीसंस्थनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Battalion 50
बटालियन 50

'बटालियन 50'मध्ये शूरवीरांची गाथा : भारतीय सीमेवर देशाचे संरक्षण करणारे सैनिक अत्यंत खडतर आयुष्य जगत असतात. ते तिथे असतात म्हणून देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. जीवाची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून आपली ड्युटी करताना ते कधीच चुकत नाहीत. त्यांना आपल्या देशवासीयांची काळजी असते. परंतु ज्यांच्यासाठी ते आपल्या प्राणांची बाजी लावतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता कोणी व्यक्त करताना दिसत नाही. 'बटालियन 50' हा चित्रपट याबद्दलची उणीव भरून काढणारा आहे. या चित्रपटातून सैनिकांच्या मानसिकतेवर आणि भावनिकतेवर जोर देण्यात आला असून त्यातून सैनिकविश्व कसे असते याची कल्पना प्रेक्षकांना दिली जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी केले आहे. भारतीय इतिहासातल्या या शरीरातील रक्त सळसळू लावणाऱ्या शूरवीरांची गाथा जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

'बटालियन 50' चित्रपटाबद्दल : या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा महेश विनायक कुलकर्णी, 'किंग प्रोडक्शन' आणि तुषार कापरे पाटील यांनी वाहली आहे. 'बलोच' फेम अभिनेता गणेश शिंदे चित्रपटात मुख्य भूमिकेत असून बाकी कलाकारांची नावे लवकरच समोर येणार आहे. 'कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत आणि प्रीतम. एस के. पाटील दिग्दर्शित 'बटालियन 50' हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Thalaivar 170 : 'थलैवर 170'मध्ये दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत 33 वर्षांनंतर दिसणार एकत्र...
  2. Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणात सापडल्यानंतर राज कुंद्रानं केला खुलासा; म्हटलं पत्नी शिल्पा शेट्टीनं दिली साथ...
  3. Ranbir Kapoor break from films : आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीसाठी रणबीर कपूर घेतोय सहा महिन्यांचा ब्रेक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.