ETV Bharat / entertainment

Drishyam 2 : दृष्यम २ ट्रेलरने उत्कंठा वाढवली, अजय देवगणच्या चाहत्यांसाठी पर्वणी

author img

By

Published : Oct 17, 2022, 1:53 PM IST

Updated : Oct 17, 2022, 2:16 PM IST

दृष्यम २ चा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे. अडीच मिनीटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर अजय देवगणच्या चाहत्यांसाठी एक अनोखी पर्वणी आहे.

दृष्यम २ ट्रेलरने उत्कंठा वाढवली
दृष्यम २ ट्रेलरने उत्कंठा वाढवली

मुंबई - अजय देवगणचे चाहते बऱ्याच दिवसापासून दृष्यम २ च्या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. अकेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विजय साळगावकर आणि त्याचे कुटुंब जुन्या एका दबलेल्या संकटाचा पुन्हा मुकाबला करताना या सिनेमात दिसणार आहे. अजय देवगण, श्रिया सरण, तब्बू आणि अक्षय खन्ना यांची भूमिका असलेला हा चित्रपट अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केला आहे. १८ नोव्हेंबर रोजी चित्रपट देशभर थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

दृष्यम २ च्या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसते की खूनाची केस पुन्हा ओपन होते आणि साळगावकर कुटुंब धास्तावते. या संकटाचा सामना कसा करायचा हे विजयने ठरवले असले तरी त्याच्या दोन मुली आणि पत्नी भीतीच्या छायेत वावरताना दिसतात. नवा चतुर पोलीस अधिकारी खूनाच्या तळापर्यंत जाण्यासाठी नवी योजना आखतो आणि त्यासाठी नवा सापळा रचतो. या सापळ्यात साळगावकर कुटुंब बरोबर सापडते आणि विजय कन्फेशन देतो. पण तो मृतदेह सापडतो का, यात साळगावकर कुटुंब दोषी ठरते का आणि सिनेमाचा अखेर काय होतो याच्याबद्दलची उत्सुकता या ट्रेलरमुळे वाढली आहे.

अजयच्या आगामी 'दृश्यम-2' या चित्रपटांशिवाय अजय देवगण 'भोला' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. भोला साऊथ चित्रपट प्रिजनरचा अधिकृत हिंदी रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी, थँक गॉड हा एक रोमँटिक, ड्रामा आणि कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये अजय देवगण चित्रगुप्ताची भूमिका साकारत आहे. थँक गॉड या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा - इराणी महिला आंदोलनाला पाठींबा म्हणून उर्वशी रौतेलाने कापले केस, नेटिझन्स उडवताहेत खिल्ली

Last Updated : Oct 17, 2022, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.