मुंबई - आशयघनतेबरोबरच उत्कृष्ट कलाकार ही मराठी सिनेमांची उजवी बाजू समजली जाते. अनेकदा बऱ्याच चित्रपटांतून अभिनय जुगलबंदी बघायला मिळते. अशीच एक निस्वार्थी आणि निरोगी स्पर्धा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे आगामी उर्मी या चित्रपटातून. मराठीतील आघाडीच्या नायिका सायली संजीव आणि रसिका सुनील या चित्रपटांत प्रमुख भूमिकांत असून त्यांची अभिनय जुगलबंदी प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने पोस्टर लाँच - उत्तम कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या उर्मी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने लाँच करण्यात आले.१४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट महिला केंद्रित असल्याचं जाणवतं. उर्मीच्या मोशन पोस्टरमध्ये सर्वात पहिल्यांदा देखणा तरुण अभिनेता चिन्मय उदगीरकर दिसतो. रोमँटिक मुडमधील या तरुणावर अभिनेत्री सायली संजीव आणि रसिका सुनील भाळल्या आहेत. प्रेमाचा त्रिकोण असलेली ही कथा कोणकोणते रंजक वळण घेते हे पाहणे औत्सुक्यांचे ठरणार आहे. या मोशन पोस्टरमध्ये ऐकू येणारे संगीत एनर्जेटिंक वाटत आहे. यंदाच्या व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधन निर्मात्यांनी या मोशन पोस्टरचे अनावरण केले आहे. हे पोस्टर प्रेक्षकांना आवडत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियावरुन वाटते. भरपूर जणांनी लाईक व शेअरचे बटन दाबून उर्मी चित्रपटावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा व ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
आशयघन उर्मी चित्रपटाची निर्मिती - समृद्धी क्रिएशनच्या डॉ. प्रवीण दत्तात्रय चौधरी यांनी उर्मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनीच चित्रपटासाठी कथा आणि गीतलेखनही केलं आहे. डॉ. चैताली प्रवीण चौधरी आणि मालतीबाई दत्तात्रय चौधरी यांनी चित्रपटाची सहनिर्माती केली आहे. राजेश बालकृष्ण जाधव यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनासह पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चौधरी यांनी संगीत, कौशल गोस्वामी यांनी छायांकन अनंत मारुती कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे तर महेश गोपाळ भारंबे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
उर्मीची तगडी स्टार कास्ट - अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री सायली संजीव, रसिका सुनील, नितीश चव्हाण आणि माधव अभ्यंकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. उर्मी या चित्रपटात दोन अभिनेत्री प्रमुख भूमिकांत असून पुढे आता काय घडणार याबद्दल उत्सुकता आहे.
हेही वाचा - Valentine's Day 2023 : ताजमहालसमोर प्रिन्स कार्तिक आर्यन क्रिती सेनॉनसोबत झाला रोमँटिक