मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या वादग्रस्त चित्रपट 'आदिपुरुष'मुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन माता सीतेच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाला देशभरातून विरोध होत असून चित्रपट निर्मात्यांवर चौफेर टीका होत आहेत. दुसरीकडे, 'आदिपुरुष' चित्रपटाला होत असलेला तीव्र विरोध पाहून क्रिती सेनॉनची आई गीता सेनॉन यांनीही एक पोस्ट शेअर केली आणि लोकांनी चित्रपटाला चुकीच्या दृष्टीकोनातून पाहू नये असे आवाहन केले. चित्रपटावर जोरदार टीका होत असल्याने चित्रपट निर्माते सध्याला नाराज आहे. दरम्यान, या चित्रपटात 'जानकी'ची भूमिका साकारणारी क्रिती सेनॉन हे दु:ख विसरण्यासाठी तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवला आहे.
क्रिती सेनॉन काय केले : क्रिती सेनॉन ने तिची वेदना व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ती तिच्या बहिणी आणि त्यांच्या मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये क्रिती सॅननने लिहिले आहे, मला या प्रेमाची गरज होती, मी माझ्या प्रियजनासोबत चांगला वेळ घालवला. 'मावशीची डॉल' दरम्यान त्याचवेळी, क्रितीने इंस्टा स्टोरीच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे हृदय प्रेमाने भरले आहे. क्रितीच्या या पोस्टवर तिची धाकटी बहीण नुपूर सेनॉनने लिहिले आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. त्यानंतर या पोस्टवर अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केल्या आहे. एका चाहत्याने कमेंट देत म्हटले, आशीर्वाद सुखी भवः तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहले, जुने रामायण चांगले होते. अशा अनेक कमेंट या फोटोवर आल्या आहे.
आदिपुरुषाची अवस्था काय आहे? : आदिपुरुष या चित्रपटाला 24 जून रोजी 9वा दिवस सुरू झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार जास्त संघर्ष करत असून या आठ दिवसांत चित्रपटाने 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. दरम्यान, चित्रपटाने आठव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ 3.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे, यावरून असे दिसून येत आहे की आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकणार नाही. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच वादच्या भोवऱ्यात अडकला होता. प्रेक्षकांनी या चित्रपला नाकारले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे बघणे लक्षणीय ठरणार आहे.
हेही वाचा :
- Adipurush Box Office Collection Day 8 : आठव्या दिवशी ‘आदिपुरुष’या चित्रपटाच्या कमाईत झाली फार मोठी घसरण
- Ileana D'Cruz reveals : 'बाळाच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकले', इलियाना डिक्रूझने सांगितला अनुभव
- Sobhita Dhulipala on naga chaitanya : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचे कौतुक करताना दिसली शोभिता धुलिपाला