ETV Bharat / entertainment

Adah Sharma And Sushant Singh Rajput : 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माने सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट खरेदी करण्याच्या बातमीवर केला खुलासा... - अदा शर्माची प्रतिक्रिया

ब्लॉकबस्टर 'द केरळ स्टोरी'मधील अभिनेत्री अदा शर्मा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मुंबईतील वांद्रेमधील फ्लॅट बाहेर दिसली होती. दरम्यान आता अदाने हा फ्लॅट विकत घेण्याच्या बातमीवर खुलासा केला आहे.

Adah Sharma
अदा शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 4:42 PM IST

मुंबई : अदा शर्माचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप गाजला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. हा चित्रपट प्रेक्षकांना 'द काश्मीर फाइल्स'प्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. 'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर अदा शर्माला खूप चांगली प्रसिद्ध मिळाली आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर स्वतःबद्दल अपडेट देताना दिसते. दरम्यान आता नुकतीच अदाबद्दल एक बातमी समोर आली होती. अदा शर्मा सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट विकत घेणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. नुकतीच अदा ही सुशांत सिंग राजपूतच्या फ्लॅटबाहेर दिसली, त्यानंतर अदा हा फ्लॅट विकत घेईल असे सर्वांना वाटू लागले होते.

अदा शर्माने दिली प्रतिक्रिया : सुशांत सिंग राजपूतच्या फ्लॅट खरेदी संदर्भात अदा शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अदाने यावर बोलताना सांगितले, 'जे काही असेल ते मी तुम्हाला आधी सांगेन. मी तुम्हाला वचन देते की ते काहीही असो... मी तुमचे तोंड गोड करीन... काहीही असेल तरी'. असे तिने तिच्या चाहत्यांना म्हटले आहे. खूप दिवसांपूर्वी सुशांतने एका पेंटच्या जाहिरातीची झलक शेअर केली होती. या जाहिरातीत सुशांतने त्याच्या आवडीची अनोखी सजावट आणि फोटो देखील प्रदर्शन केले होते. याशिवाय सुशांतने त्याच्या टेलीस्कोपबद्दल देखील 'द कपिल शर्मा' शोमध्ये सांगितले होते. सुशांतने त्याचे घर त्याच्या आवडीप्रमाणे सजवले होते.

रिअल इस्टेट ब्रोकरने केला खुलासा : 14 जून 2020 रोजी सुशांत एका दुमजली घरात मृतावस्थेत आढळल्यानंतर या घरासाठी भाडेकरू शोधणे एक आव्हान बनले होते. मुंबईतील एका रिअल इस्टेट ब्रोकरने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता, की सुशांतच्या मृत्यूनंतर या मालमत्तेसाठी भाडेकरू मिळविण्यासाठी तीन वर्षे लागली. सुरुवातीला हे घर घेण्यास कोणी तयार नव्हते, पण नंतर हळूहळू अधिक लोकांनी घरामध्ये रस दाखवला. अदा शर्माने 'द केरळ स्टोरी'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. भारतात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 241.74 कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचा :

  1. Dream girl 2 box office collection day 3 : 'ड्रीम गर्ल 2'ने बॉक्स ऑफिसवर केली तीन दिवसात 'इतकी' कमाई...
  2. Palak Tiwari And Ibrahim ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान डिनर डेटवर पुन्हा एकत्र
  3. Gadar २ vs OMG २ box office collection day १७ : 'गदर 2' बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या कमाईची आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.