ETV Bharat / entertainment

Subi Suresh passed away : मल्याळम स्टार सुबी सुरेश यांच्या अकाली निधनाने फिल्म आणि टीव्ही जगतावर शोककळा - untimely death of Malayalam star

लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री व टीव्ही होस्ट सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून सुबी सुरेश यांना यकृताशी संबंधित आजार होता. यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरू होते.

Subi Suresh passed away
Subi Suresh passed away
author img

By

Published : Feb 22, 2023, 2:26 PM IST

कोची - लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री, टेलिव्हिजन अँकर आणि स्टेज शो परफॉर्मर, सुबी सुरेश यांचे बुधवारी कोची येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी दिल्यानंतर टीव्ही जगतासह प्रेक्षकांच्यातही शोककळा पसरली. गेल्या काही दिवसापासून सुबी सुरेश यांना यकृताशी संबंधित आजार होता. यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरू होते. वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी या गुणी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

स्टेज शोमध्ये उत्सफुर्त बोलण्याबद्दल सुबी सुरेश यांना ओळखले जात असे. टीव्ही आणि चित्रपट तारे तारकांइतकेच सुबी यांचे फॅन फॉलोइंग होते. काही वर्षापूर्वी सुबी यांनी मिमिक्री कलाकार म्हणून करियरला सुरुवात केली होती. एक महिला मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. हीच लोकप्रियता त्यांना लवकरच स्टेज शोची उत्तम सूत्रसंचालिका घडवण्यात मैलाचा दगड ठरली. तिने हळूहळू स्टेज आणि टेलिव्हिजनवरील पुरुष-प्रधान कॉमेडी शोमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले.

अल्पावधीतच, विविध टीव्ही वाहिन्यांद्वारे आयोजित केलेल्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात सुबी सुरेश हे नाव सतत झळकू लागले. तिचा आनंदी आणि उत्साही चेहरा भल्या भल्यांना बोलते करत होता आणि मिश्कील वाणीतून थेट लोकांच्या मनापर्यंत उलगडत होता. त्यांनी तमाम प्रेक्षकांची मने जिंकली होती. टीव्ही वाहिनीवरील सर्वाधित लोकप्रिय अँकर बनण्याचे भाग्या त्यांना लाहले होते. अर्थातच एक जबरदस्त टॅलेंट असल्यामुळेच हे शक्य होऊ शकले.

2006 मध्ये कनकसिंहासनम या चित्रपटातून सुबी सुरेश यांनी रुपेरी पडद्यावर आपले पदार्पण केले. सुबी सुरेशने यांनी मल्याळम भाषेतील एल्सम्मा एन्ना अंकुट्टी आणि हॅप्पी हसबंड्ससह 20 हून अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. सुबी सुरेश यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

सुबी सुरेश यांच्या निधनाबद्दल अनेक सेलेब्रिटीजसह सिनेक्षेत्रातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, सुबीने रिअॅलिटी शो आणि कॉमेडी कार्यक्रमांद्वारे मल्याळी लोकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. सुबी सुरेश यांच्या निधनाने मल्याळम फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक उभयता तारा मावळल्याची भावना दिग्गज बोलून दाखवत आहेत. सुबी यांच्याकडे समोरच्याला बोलते करण्याची एक अनोखी कला होती. बोलताना सहज समोरच्या व्यक्तीला बोलते करायच्या, नर्म, हलक्या फुलक्या विनोदातून चर्चा फुलवत न्यायची ही कला त्यांना अवगत होती. सुबी जेव्हा मुलाखत घ्यायच्या तेव्हा अबोल व्यक्तीही मनमोकळ्या गप्पा मारत असल्याचा अनुभव प्रेक्षक घेत होते. एकंदरीतच एक होतकरू कलावंत हरपल्याची भावना सर्वांच्या तोंडून ऐकू येत आहे.

हेही वाचा - Shahid Kapoor royal photos : शाहिद कपूरने सिड कियाराच्या लग्नातील शाही थाटातील फोटो केले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.