मुंबई : आज देशभरात श्रावण शिवरात्रीची पूजा केली जात आहे. दरम्यान आता, नुकतीच एक बॉलिवूडमधून एक बातमी समोर येत आहे. श्राणच्या या शुभ मुहूर्तावर गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या इतिहासावर 'द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ' या पॅन इंडिया चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगूमध्ये शूट केला जाणार आहे. याशिवाय रूपेरी पडद्यावर हा चित्रपट १२ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप थापा करणार आहे. तसेच या चित्रपटाचे लेखनदेखील अनुप थापा यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते मनीष शर्मा आणि रणजीत शर्मा आहेत. 'द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ' हा चित्रपट २ इडियट्सच्या बॅनरखाली बनविल्या जाणार आहे. 'द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ'च्या घोषणेसह एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सोमनाथ मंदिराचा इतिहास : चित्रपटाची कथा गुजरातच्या वेरावळ बंदरात असलेल्या सोमनाथ मंदिरावर आधारित आहे. या मंदिराला देव पाटण असेही म्हणतात. या मंदिराला अनेक मुघल शासकांनी वारंवार तोडले होते. सोमनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मानले जाते. या मंदिराचे निर्माण चंद्रदेव सोमराज केले होते. या मंदिरावर १०२५ महमूद गझनवीने हल्ला केला होता. या चित्रपटाच्या टीझरमध्येदेखील गझनवी हा हल्ला करताना दाखविला गेला आहे. या युद्धात ५० हजारांहून अधिक भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले होते. सोमनाथ मंदिर हे या क्रूर शासकाने मंदिर तोडले आणि येथून सर्व हिरे आणि दागिने चोरले होते. या युद्धाबाबत असे म्हटले जाते की, या युद्धात महमूद गझनवीने ५००० सैनिक आणून या पवित्र मंदिरावर हल्ला केला होता.
सोमनाथ मंदिराबद्दल : या चित्रपटाच्या टिझरमध्ये पंतप्रधान डॉ. राजेंद्र प्रसाद बाबू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे देखील दाखविले गेले आहे. या मंदिरावर अनेकदा हल्ले झाले आहेत. या मंदिराची पुनर्रचना ही १९५०-१९५१ दरम्यान करण्यात आली होती. तसेच हे मंदिर हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तसेच सोमनाथ मंदिराचा १९व्या-आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला काही इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी सक्रियपणे अभ्यास केला होता,त्यानंतर त्यांना काही अवशेष इस्लामिक मशिदीचे आढळून आले या मंदिराला मशिदीत रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे या शोधात सांगण्यात आले होते. तसेच या मंदिराची पुनर्रचना ही १९५०-१९५१ दरम्यान करण्यात आली होती.
हेही वाचा :