ETV Bharat / entertainment

झोया अख्तरच्या डिनर पार्टीत सुहाना, अगस्त्य आणि खुशी कपूरसह 'द आर्चिज' गँगची हजेरी - झोया अख्तरच्या डिनर पार्टीत सुहाना

A dinner party for The Archies Gang : 'द आर्चिज' हा स्टार किड्सच्या पदार्पणाचा चित्रपट 7 डिसेंबर रोजी रिलीज झाला. यातील सर्वच कलाकारांचे काम पाहून सोशल मीडियावर जोरदार कौतुक होतंय. दिग्दर्शिका झोया अख्तरनं द आर्चिज गँगसाठी खास डिनरचे आयोजन केले होते. यासाठी सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर उपस्थित होते.

A dinner party for The Archies Gang
झोया अख्तरच्या डिनर पार्टीत सुहाना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 11:28 AM IST

मुंबई - A dinner party for The Archies Gang : 'द आर्चिज' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रवाहित झाल्यानंतर देश भरातून कलाकार आणि दिग्दर्शकांसह चित्रपटाच्या टीमचं कौतुक सुरू आहे. दरम्यान, झोया अख्तरनं चित्रपटाच्या टीमसाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं. डिनरमध्ये अगस्त्य नंदा, सुहाना खान, मिहिर आहुजा, आयशा सैगल, वेदांग रैना आणि युवराज मेंडा यांच्यासह नव्या नवेली नंदा उपस्थित होते.

काल रात्री उशिरा झोयाच्या घरातून बाहेर पडताना ही स्टार किड्सची टोळी दिसली. या पार्टीत सुहाना पिवळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात सुंदर दिसत होती. तिने सुंदर नक्षीदार शॉर्ट कुर्ता मॅचिंग पलाझो आणि ऑर्गेन्झा दुपट्ट्यासह परिधान केला होता. तिने आपल्या मिनिमलिस्टिक ऍक्सेसरीमध्ये कानामध्ये आकर्षक कर्णफुले घातल्याचं दिसत होतं. घराबाहेर पडताना अनेकांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. शांतपणे तिने चाहत्यांना प्रतिसाद दिला व फोटोसाठी पोजही दिल्या.

अगस्त्य नंदानं यावेळी चित्रपटाचा संदर्भ असलेली हुडी घातली होती. त्याच्या स्वेटशर्टवर त्याचा मामा अभिषेक बच्चनच्या अलिकडेच रिलीज झालेल्या 'घूमर' चित्रपटाचा लोगो दिसत होता. त्याच्यासोबत बहिण नव्या नवेलीही पार्टीला हजर होती. चित्रपटातील सर्वच कलाकार त्यांच्या कौतुकासाठी आयोजित केलेल्या या पार्टीला अतिशय उत्साहानं हजर होते.

'द आर्चीज' हा म्यझिकल चित्रपट अमेरिकन कॉमिक्सचे भारतीय सिनेमॅटिक सादरीकरण आहे. अगस्त्य नंदाने आर्ची अँड्र्यूजपासून प्रेरित भूमिका साकारली आहे, सुहाना खानने यात वेरोनिका लॉजच्या भूमिकेला मूर्त रूप दिलंय. जान्हवीची धाकटी बहिण खुशी कपूर यामध्ये बेटी कूपरची भूमिका साकारते आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी कलाकारांच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या एकूण वातावरणाची प्रशंसा केली आहे. अगस्त्य आणि खुशीच्या चमकदार अभिनयावर चाहते खूश झाल्याचं दिसत आहे. सुहानाच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सवरही नेटिझन्स भलतेच खूश झाल्याचं दिसतंय. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी चित्रपटाचं कौतुक करणारे रिव्हयू लिहिले आहेत. या चित्रपटानं रंजक कथा, फ्रेश कलाकार, ताल धरायला लावणारं मंत्रमुग्ध संगीत आणि साठच्या दशकातील सुंदर काल्पनिक रिव्हरडेल शहराची पार्श्वभूमी सगळंच भारी असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

हेही वाचा -

  1. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'चा टीझरचा काउंट डाऊन सुरू

2. 'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये ऑरीनं केली धमाल, झाला ट्रोल

3. अभिनयानं हसविणारे ज्युनिअर मेहमूद प्रेक्षकांना गेले रडवून! मुंबईत उपचार सुरू असताना निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.