मुंबई : मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये नायक-नायिकेच्या वेगवेगळ्या जोड्या पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अशीच एक फ्रेश आणि युथफूल जोडी नवीन मराठी चित्रपट ‘मन कस्तुरी रे’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटातून तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे एकत्र आले आहेत.
हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस १५ फेम तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमातून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्या सोबत मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे झळकणार आहे. अभिनय आणि तेजस्वी ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे पोस्टर सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले.
पोस्टरचा हटके लूक
या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कुटवरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे आणि त्यांचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाद्वारे संकेत माने दिग्दर्शनीय पदार्पण करीत आहेत. ’जसा पोस्टरचा लूक फ्रेश आहे, तसाच फ्रेश लूक संपूर्ण सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा एक युथफुल सिनेमा आहे’, असं ते म्हणाले.
तेजस्विनी अभिनयची फ्रेश जोडी
ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रम्पाट नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची अभिनय बेर्डेच्या फॅन्सना उत्सुकता आहे. तेजस्वीनीने गेली अनेक वर्षे संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का आणि त्यानंतर बिग बॉस १५ मधून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सध्या ती ‘नागीन ६’ मधून प्रेक्षकांना रिझवतेय. आता हीच प्रभावी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमात दिसून येणार आहे.
हेही वाचा - Malaika Arora Car Accident : मलायकाच्या डोक्याला पडले टाके; अपघातातून सुखरूप बचावली