ETV Bharat / entertainment

Mogalmardini Chhatrapati Tararani : रणमर्दिनी, रणरागिणी, महाराणी ताराबाई यांच्या शौर्याची गाथा, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’! - Directed by Rahul Janardhan Jadhav

रणमर्दिनी, रणरागिणी महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टिझर प्रसिध्द झाला आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित हा चित्रपट आहे.

Mogalmardini Chhatrapati Tararani
मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी
author img

By

Published : Mar 4, 2023, 5:31 PM IST

मुंबई - गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक चित्रपटांची रांग लागलेली दिसत आहे. त्यातही मराठी चित्रपटसृष्टीत शिवकालीन चित्रपटांना पाठिंबा मिळत असल्यामुळे त्या कालखंडातील अनेक कथा सिनेमारुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात अजून एका चित्रपटाची भर पडलीय, ती म्हणजे रणमर्दिनी, रणरागिणी महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’.

अवघ्या २५ वर्षांची मराठ्यांची राणी, जिने मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य जिंकायला आलेल्या औरंगजेबाला कायमचा या मातीत गाडला, त्या महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार असून 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'ची पहिली झलक नुकतीच बाहेर आली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा चित्रपट असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे..

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटाच्या टिझरमध्ये मराठा साम्राज्याला निडरपणे सांभाळणाऱ्या, तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर, छत्रपती ताराराणीच्या कर्तृत्वाचे गोडवे अनुभवायला मिळतील याची कल्पना येते. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचेल आणि असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची युद्धनिपुणता आणि आक्रमक राजकीय मुत्सद्देगिरी प्रामुख्याने समोर येईल असे दिसते. छत्रपती ताराराणी यांना कोणत्या प्रसंगांत हे नेतृत्व स्वीकारावे लागले याची पार्श्वभूमीदेखील उलगडेल. असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या ताराराणी यांच्यावरील तीन छत्रपतींचे छत्र हरविल्यामुळे त्यांच्यातील कणखरपणा अनेक स्त्रियांना स्फूर्तिदायक ठरेल असा निर्मात्यांना विश्वास वाटतो. महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे असे ते म्हणतात. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे.

एक युगप्रवर्तक सासरा, पराक्रमी पिता, कुशल राजकारणी पती आणि शूर व गुरुसमान दिर हे ताराराणी यांचे आदर्श होते. त्यांच्या सानिध्यात वावरल्यामुळे आणि स्वतःवर विश्वास असल्यामुळे छत्रपती ताराराणी यांना मराठ्यांचा बलाढ्य शत्रू मुघलांसोबत दोन हात करण्याची स्फूर्ती आणि बळ मिळाले. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. किंबहुना त्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलसुद्धा करीत असत. कठीण परिस्थितीमध्येसुद्धा राज्यकारभार सांभाळणाऱ्या ताराराणी यांचे मुलगी, सून, बायको, आई तसेच कर्तृत्ववान राजघराण्यातील स्त्री असे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू तसेच आदर्श होते यात शंका नाही.

या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव यांच्या मते आजच्या घडीला तरुण पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची जाण असणारी व्यक्तिमत्वे फारच विरळा आहेत आणि म्हणूनच त्यांनी काळाची गरज म्हणून आणि प्रत्येक पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटामार्फत या चित्रपटात छत्रपती ताराराणींची भूमिका सोनाली कुलकर्णी करीत आहे. तिच्या मते छत्रपती ताराराणी या एक रणरागिणी होत्या आणि त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यामुळेच अश्या तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळाली हे भाग्य तर आहेच परंतु एक जबाबदारीसुद्धा.

या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत.

हेही वाचा - Deepika Rocks Chic Look : ऑस्कर 2023 मध्ये प्रेझेन्टर म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदा दीपिका पदुकोणने लावली सार्वजनिक हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.