ETV Bharat / entertainment

Tamannaah gets emotional : चाहत्याच्या हातावर आपल्या चेहऱ्याचा टॅटू पाहून भावूक झाली तमन्ना भाटिया - Tamannaah Bhatia gets emotional

मुंबई विमानतळावर एका चाहतीला भेटल्यानंतर तमन्ना भाटिया भावूक झाली. या डाय-हार्ड फॅनने तमन्नाचा चेहरा तिच्या हातावर गोंदवला होता. तिने तमन्नाचे स्वागत करताना तिच्या पायाला स्पर्श करुन नमस्कार केल्यानंतर तमन्नाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

Tamannaah gets emotiona
भावूक झाली तमन्ना भाटिया
author img

By

Published : Jun 27, 2023, 12:45 PM IST

मुंबई - अभिनेत्री तमन्ना भाटिया जेव्हा मुंबई विमानतळावर आली होती, तेव्हा तिच्या भेटीसाठी काही चाहते उभे होते. त्यात एका चाहतीने तिला पाहताच तिचा चरणस्पर्श केला. तमन्नाने असे काही तरी घडेल अशी कल्पनाही केलेली नव्हती. त्या चाहतीच्या हातवर तिचा टॅटूही होता. आपल्यावर चाहते इतके प्रेम करतात हे पाहून तमन्नाच्या डोळ्यात अश्रू तरळल्या शिवाय राहिले नाहीत. या प्रसंगाचा एक सुंदर व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये चाहतीने तमन्नाच्या पायाला स्पर्श करून तिचे स्वागत केले. या कट्टर चाहतीने तमन्नाला एक चिठ्ठी, कार्ड आणि पुष्पगुच्छ देखील भेट दिले. या प्रसंगाने तमन्ना भावूक झाली आणि तिने चाहतीला मिठी मारली. त्यानंतर या महिलेने तमन्नासोबत बोलताना तिच्या हातावरचा टॅटू दाखवला. हा टॅटू तमन्नाच्या चेहऱ्यावर काळ्या आणि पांढऱ्या रंगात शाईचा होता. चेहऱ्याच्या टॅटूसोबत, खाली 'लव्ह यू तमन्ना' असे शब्द देखील कोरले होते.

तमन्नाने चाहत्याला मिठी मारली आणि प्रेमाबद्दल अनेक वेळा आभार मानले. तिच्या प्रवासासाठी, तमन्नाने ब्राऊन ब्लेझर आणि मॅचिंग पॅंटखाली पांढरा टॉप घातला होता. अभिनेत्री तमन्नाने एअरपोर्ट लूकसाठी पांढरे शूज निवडले होते आणि काळी बॅग सोबत घेतली होती. मुंबई विमानतळावरील तमन्ना आणि तिच्या चाहतीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली की, मी तमन्नाला १३ वर्षांपासून ओळखतो ती सोन्याच्या काळजाची अभिनेत्री आहे. तमन्नासाठी कोणीतरी तिचा चेहरा हातावर गोंदवून घेते हे तिच्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे व ती भाग्यावान असल्याचेही एकाने लिहिलंय.

तमन्ना अलीकडेच अरुणिमा शर्मा दिग्दर्शित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित जी कारदा या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेचे लिखाण हुसैन दलाल आणि अब्बास दलाल यांनी सह-लेखन केले आहे आणि त्यात आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी आणि संवेदना सुवाल्का यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेचा प्रीमियर १५ जून रोजी प्राइम व्हिडिओवर झाला. तमन्ना आगामी लस्ट स्टोरी २ मध्ये अभिनेता विजय वर्मासोबत झळकणार आहे.

हेही वाचा -

१. Mega Budget Film Project K : 'प्रोजेक्ट के'साठी प्रभास, कमल हसनला किती कोटी रुपये मिळाले? आकडा वाचून बसेल धक्का

२. Kanimozhi Ticket Controversy : कमल हसन यांनी कोईम्बतूरच्या पहिल्या महिला बस चालकाला भेट दिली कार

३. Allu Sirish : अल्लू सिरिशने बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर केला शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.