ETV Bharat / entertainment

Tabu's first look in Bhola : अजय देवगणच्या भोलामधील करारी भूमिकेतील तब्बूचा फर्स्ट लूक - तब्बूचा फर्स्ट लूक

अजय देवगणने ट्विटरवर त्याच्या भोला या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूचा फर्स्ट लूक दाखवला आहे. यात तब्बू करारी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे.

भोलामधील करारी भूमिकेतील तब्बूचा फर्स्ट लूक

author img

By

Published : Jan 17, 2023, 2:11 PM IST

मुंबई - अजय देवगण दिग्दर्शित करत असलेल्या भोला या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूचा आक्रमक करारी लूक प्रसिध्द झाला आहे. अजयने ट्विटरवर तिच्या फर्स्ट लूकची झलक एका क्लिपमधून दाखवली आहे. यात तब्बू पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे.

या लूकसह या व्हिडिओ क्लिपमध्ये तिचा दमदार डायलॉगही ऐकू येतो. ती हिंदीत म्हणते, 'आज रात या तो वो हमे ढूँढ लेगा, या हम उसे, बंदूक की नौकरी की है, गोली तो खानी पडेगी.'

अजय देवगण सध्या 'दृष्यम २' चे यश अनुभवत आहे. भारतासह जगभर या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत. याचदरम्यान त्याच्या आगामी भोला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यात अजय देवगण अत्यंत साहसी, गुढ आणि आक्रमक दिसत आहे. टीझरची सुरुवात एका अनाथ आश्रमापासून होते. यात एका अनाथ मुलीला सांगितले जाते की तू सकाळी लवकर उठ, तुला भेटायला कोणीतरी येणार आहे. ही मुलगी आपली इतर सहकारी बालमैत्रीणींना विचारते की नातेवाईक कोण कोण असतात? तर थोडक्यात ही अनाथ मुलीच्या आयुष्यता तिच्या जवळचे कोणी तरी भेटायला येणार आहे.

तब्बूचा फर्स्ट लूक
तब्बूचा फर्स्ट लूक

दुसरीकडे एक कैदी भगवद्गगीता वाचताना दिसतो. त्याची सुटका झाली आहे आणि आता तो जेलबाहेर पडणार आहे. हा अद्भूत कैदी भोला आहे. तो कैदी का झाला इथंपासून ते अनाथ मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचा कथापट भोलामध्ये पाहायला मिळणार आहे.

भोला हा चित्रपट 2019 च्या तमिळ-भाषेतील लोकेश कनागराजचा हिट चित्रपट 'कैथी' (कैदी) चा रिमेक आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माताही अजय देवगण आहे. हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे आणि मार्च 2023 मध्ये रिलीज होणार आहे.भोला हा चित्रपट थ्रीडीमध्येही बनत असून भोलाच्या रुपाने अजय देवगण पुन्हा एकदा एक लार्जर दॅन लाईफ एंटरटेनर चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात अजय देवगणसह अभिनेत्री तब्बू आणि अमला पॉल अभिनय करत आहे.

यापूर्वी सहकारी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात केल्यामुळे प्रतिक्रियांचा सामना केलेला अभिनेता अजय देवगण, त्याच्या सोशल मीडिया पोस्टसह अधिक सावध होता कारण त्याने त्याच्या अनुयायांना दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता.

'भोला', ज्यामध्ये तब्बूचीही भूमिका आहे, हा 2019 च्या तमिळ सुपरहिट 'कैथी'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'गोलमाल अगेन', 'विजयपथ', 'हकीकत', 'तक्षक', 'दे दे प्यार दे', 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या अजय आणि तब्बू यांच्यातील हा नववा चित्रपट आहे.'

हेही वाचा - पत्नीसह अमिताभ इंदूरमध्ये दाखल, फोटो काढणाऱ्यांवर भडकल्या जया बच्चन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.