मुंबई - टेलिव्हिजन मालिका पवित्र रिश्तामधील भूमिकेसाठी ओळखली जाणारी अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) स्वातंत्र्य वीर सावरकर ( Swatantra Veer Savarkar ) या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सोबत दिसणार आहे. हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर ( Vinayak Damodar Savarkar ) यांच्या जीवनावर आधारित आहे. यात अमित सियालही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर, तिने टायगर श्रॉफच्या बागी 3 आणि कंगना राणौत अभिनीत मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी यासारख्या चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. अभिनेत्री अंकिताचे म्हणणे आहे की तिला नेहमीच आव्हानात्मक भूमिका करण्यात रस असतो आणि या चित्रपटाची कथा तिला त्याचा भाग होण्यासाठी प्रेरणादायी वाटली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अंकिता म्हणाली: "मला आव्हानात्मक आणि निर्णायक भूमिका करायला आवडतात जी केवळ कथाच पुढे नेत नाहीत तर प्रेक्षकांवरही प्रभाव टाकतात. स्वातंत्र्य वीर सावरकर ही अशीच एक प्रेरणादायी कथा आहे जी सांगायची गरज आहे आणि तिच्याशी निगडीत असल्याचा मला आनंद आहे."
मान्सून वेडिंग या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या रणदीप हुडाला वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, साहेब, बीवी और गँगस्टर, रंग रसिया, जिस्म २ आणि इतर अनेक चित्रपटांद्वारे खूप लोकप्रियता मिळाली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटातून तो दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे आणि चित्रपटात मुख्य भूमिकाही साकारणार आहे.
स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची असून उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी कथा लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओ, निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान यांनी केली आहे. हे 26 मे 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
हेही वाचा - दयाबेनला कॅन्सरच्या बातमीने चाहत्यांना धक्का, अफवा असल्याचा जेठालालचा खुलासा