ETV Bharat / entertainment

"सुष्मिताच्या निवडीवर शंका घेण्यास जागा नाही" - रोहमन शॉल - ललीत मोदी आणि सुश्मिता सेन प्रेम प्रकरण

ललीत मोदी आणि सुश्मिता सेनच्या प्रेम प्रकरणामुळे सर्वच चकित झालेले असताना सुष्मिता सेनचा माजी बॉयफ्रेंड रोहमन शॉलने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, सुष्मिताच्या निवडीवर शंका घेण्यास जागा नाही. त्याने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट देखील शेअर केली आहे ज्यात त्याच्या माजी प्रेयसीला स्पष्ट पाठिंबा दिसत आहे.

रोहमन शॉल पोस्ट
रोहमन शॉल पोस्ट
author img

By

Published : Jul 16, 2022, 2:01 PM IST

मुंबई - सुष्मिता सेनचा माजी प्रियकर रोहमन शॉल याने ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचे नाते सार्वजनिक केल्याबद्दल सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. रोहमनने सोशल मीडियावर एक गुढ पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्यात ललित मोदीला डेट करण्यावरून झालेल्या प्रतिक्रियांदरम्यान रोहमन शॉल आपल्या माजी प्रेयसीचा बचाव करत आहे.

सुष्मिता २०१८ मध्ये इन्स्टाग्रामवर भेटल्यानंतर मॉडेल रोहमन शॉलला डेट करायला सुरुवात केली होती. काही वर्षे एकत्र फिरल्यानंतर गेल्या वर्षी या जोडप्याने वेगळे होण्याची घोषणा केली. ब्रेकअपनंतरही दोघांमधील मैत्रीचे संबंध कायम आहेत. एका वेबलॉइडशी बोलताना रोहमनने म्हटले आहे की, ''सुष्मिताच्या निवडीवर शंका घेण्यास जागा नाही.'' मॉडेल-अभिनेत्याने सांगितले, "चला त्यांच्यासाठी आनंदी होऊया ना. प्रेम सुंदर आहे. मला एवढेच माहित आहे की जर तिने एखाद्याला निवडले असेल तर तो तिच्यासाठी योग्य आहे."

शुक्रवारी रोहमनने सोशल मीडियावर एक गुढ नोटही शेअर केली. इंस्टाग्रामवर रोहमनने एक टीप शेअर केली, ज्यात लिहिले आहे, "किसी पर हसने से अगर तुम्हें सुकून मिल जाए तो हस लेना!! क्यूंकी परेशन वो नहीं, तुम हो!! प्रेमाचा प्रसार करा तिरस्काराचा नाही."

रोहमन शॉल पोस्ट
रोहमन शॉल पोस्ट

मॉडेलने सोशल मीडियावर तिच्या माजी मैत्रिणीची खिल्ली उडवल्याबद्दल ट्रोलर्सवर अप्रत्यक्ष खणखणीत टीका केली. रोहमनला सध्या सोशल मीडियावर खूप प्रतिक्रियेला सामोरे जावे लागत आहे, कारण त्याची कथित प्रेयसी IPL संस्थापक ललित मोदीसोबत प्रेमात पडली आहे.

मोदींसोबतच्या लग्नाच्या सर्व अफवा फेटाळून लावत, अभिनेत्री सुश्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर तिने कॅप्शन दिले आहे, "लग्न केलेले नाही...नाही रिंग्ज...बिनशर्त प्रेमाने वेढलेली आहे!".

ललितने पूर्वी मीनल सगराणीशी ऑक्टोबर 1991 मध्ये लग्न केले होते. त्यांना मुलगा रुचिर आणि मुलगी आलिया अशी दोन मुले आहेत. दुर्दैवाने, 2018 मध्ये मीनलचा कर्करोगाने मृत्यू झाला. तर, सुष्मिता ही रेनी आणि अलिसा या दोन दत्तक मुलींची आई आहे.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, 46 वर्षीय अभिनेत्री सुश्मिता सेन आगामी डिस्ने + हॉटस्टारची क्राईम थ्रिलर मालिका आर्या सीझन 3 मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा - ललीत मोदीसोबत लग्नाच्या चर्चेनंतर सुश्मिता सेनने अखेर सोडले मौन

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.