ETV Bharat / entertainment

Sushant Singh Rajput Sister Shweta Singh Kirti : रक्षाबंधनावर सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भावनिक पोस्ट... - श्वेता कीर्ती सिंग

रक्षाबंधनाचा सण देशभरात जल्लोषात साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही आपल्या भावंडांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान आता दिवंगत सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने आपल्या भावाच्या आठवणीत एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना भावूक केले आहे.

Sushant Singh Rajput Sister Shweta Singh Kirti
सुशांत सिंग राजपूत आणि श्वेता सिंग कीर्ती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 1:08 PM IST

मुंबई : रक्षाबंधनाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही आपल्या भावंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान आता या खास प्रसंगी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता कीर्ती सिंगने आपल्या भावाच्या आठवणीत त्याच्या लहानपणीच्या फोटोसह व्हिडिओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत ती खूप भावूक झाली आहे. या व्हिडिओमध्ये सुशांतच्या बालपणापासून तर तारुण्यापर्यंतची झलक दाखवली गेली आहे. श्वेताच्या या पोस्टवर सुशांतचे अनेक चाहते देखील भावूक झाले आहेत. या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.

सुशांत सिंग राजपूतची बहिण झाली भावूक : सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंहने राखीच्या दिवशी आपल्या भावाची आठवण करून लिहिले 'कधी कधी असे वाटते की तू कुठेही गेला नाहीस, तू इथेच आहेस. कधी कधी असं वाटतं की आता मी तुला भेटू शकणार नाही, तुझ्याशी बोलू शकणार नाही. तुझे हसणे, तुझा आवाज मला कधीच ऐकू येणार नाही. तुला हरवल्याचं दु:ख कुणासोबत शेअर करायचं असलं तरी मी करू शकत नाही. हे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि हे इतकं जवळ आहे की ते व्यक्त करण्यासाठी शब्द सापडणे कठीण आहे. ही वेदना प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत वाढत आहे. माझ्या मनगटावर राखी बांधून प्रार्थना करते की तू जिथे आहेस तिथे तू देखील आनंदी आणि शांत राहशील'.

चाहते झाले भावूक : श्वेताच्या या पोस्टवर सुशांत चाहते तिची समजूत काढत तिला सांत्वन देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहलं, 'मी जेव्हाही त्याला पाहतो तेव्हा मी भावूक होतो' तर दुसर्‍याने लिहिलं, 'तू नेहमी आमच्या हृदयात राहशील'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे. श्वेताची ही पोस्ट पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. या पोस्टला अनेकजण लाईक करत आहे. सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतचे चाहते अजूनही त्याच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर पडू शकलेले नाहीत, त्यामुळे आजही त्याचे चाहते त्याचे फोटो पाहून भावूक होतात.

हेही वाचा :

trailer of Jawan : 'जवान' चित्रपटाचा बहप्रतीक्षित ट्रेलर रिलीज, शाहरुखच्या अ‍ॅक्शनसवर चाहते फिदा

Raksha Bandhan 2023: बॉलिवूड सेलेब्रिटींनी उत्सहात साजरा केला रक्षाबंधनाीचा सण, बहिणीसोबतचे फोटो केले शेअर

Rajkummar Rao Birthday : प्रतिभेच्या जोरावर राजकुमार रावनं चित्रपटसृष्टीत कमावलं नाव....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.