ETV Bharat / entertainment

Superstar Salman Khan : सलमान खानने छोट्या चाहत्यावर केला प्रेमाचा वर्षाव - लहान फॅन

मुंबई विमानतळावर काल रात्री सलमान स्पॉट झाला. सलमानला एका छोट्या चाहत्याने पाहिले त्यानंतर त्या चाहत्याने भाईजानकडे घाव घेतली.

Salman Khan
सलमान खान
author img

By

Published : May 25, 2023, 1:15 PM IST

मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटावर नाखुश आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा कलेक्शनही केला नाही. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही हे सलमाननेही मान्य केले आहे. आता नुकताच सलमान खानचा एअरपोर्टवरून येत असतांनाचा नवा व्हिडिओ हा चाहत्यांना नक्कीच आवडेल. काल रात्री सलमान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. विमानतळावर सलमान खान हा एका छोट्या चाहत्याला दिसला. त्यानंतर लगेच तो छोटा चाहता भाईजानकडे घावत आला. तो चाहता धावत येताना दिसल्यानंतर सलमान तिथेच थांबला.

चाहत्याने सलमानला मारली मिठी : त्यानंतर त्याने भाईजानला मिठी मारली. त्याचवेळी सलमान खाननेही या चाहत्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सलमान खानने त्याच्या डोक्याला आणि पाठेला हात लावून प्रेमाने निरोप दिला. या छोट्या चाहत्याने दंबगचे मन जिंकले असून हा व्हिडिओ पाहून चाहतेही फार खूश होत आहेत. तसेच सलमान खानच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहले, 'लव्ह यू भाईजान', तर दुसऱ्याने लिहले, भाईकी झलक सबसे अलग, तर काहीजणांनी या व्हिडिओवर फायर आणि हार्टचे इमोजी दिले आहे. सलमान खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सलमानने अनेकांना बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यास मदत केली आहे. सध्याला त्याने 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात पलक चौधरी, शहनाज गिल, सिद्यार्थ निगम या नवीन चेहऱ्यांना संधी दिली. सलमान याआधी अनेकजणांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. त्यामुळेच सलमानला बॉलिवूडचा भाईजान म्हणतात.

'टायगर-3' दिवाळीत होणार प्रदर्शित : तसेच विमानतळावर सलमान हा ब्लॅक लूकमध्ये दिसला. ब्लॅक जीन्सवर ब्लॅक टी-शर्ट आणि वर ब्लॅक लेदर जॅकेट घातलेला सलमान खान डॅशिंग दिसत होता. सलमान खान या वर्षी आगामी चित्रपट 'टायगर-3' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पुन्हा एकदा कतरिना कैफ दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Parineeti Chopra and Raghav Chadha : इंन्टाग्रामवर व्हायरल झाले परिणीती आणि राघवच्या साखरपुड्यातील सजावटीचे फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.