ETV Bharat / entertainment

Gadar 2 : 'गदर २'च्या रिलीजपूर्वी सनी देओलने दिली गोल्डन टेंपलला भेट... - अटारी वाघा बॉर्डर

सनी देओल सध्या त्याचा आगामी चित्रपट 'गदर २'चे जोरदार प्रमोशन करत आहे. आता नुकताच तो चित्रपटाच्या प्रमोशसाठी अटारी-वाघा बॉर्डर आणि गोल्डन टेंपलला येथे गेला होता. या प्रमोशन दरम्यान सनीने काही फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहेत.

Gadar 2
गदर २
author img

By

Published : Aug 6, 2023, 4:54 PM IST

मुंबई : 'गदर: एक प्रेम कथा' प्रदर्शित होऊन २२ वर्षे झाली असतील, पण तरीही हा चित्रपट लोकांच्या डोळ्यात पाणी आणतो. तारा सिंग आणि सकिना यांची पुढची कहाणी 'गदर २' मध्ये दाखवण्यात येणार आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट स्फोटक संवादांनी भरलेला आहे. या चित्रपटाबाबत केवळ त्याचे चाहतेच नाही तर समीक्षकही सनी देओलच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाची वाट खूप आतुरतेने पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सनी देओल जोरदार प्रमोशन करत आहे. याशिवाय तो अटारी-वाघा बॉर्डरवर आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने थेट गोल्डन टेंपलला भेट दिली.

सनीने अप्रतिम फोटो : सनी देओलने त्याच्या अमृतसर ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये तो अटारी-वाघा बॉडरवर बीएसएफ जवानांमध्ये दिसत आहे. दरम्यान यावेळी जवानांमध्ये सनी देओलबाबत एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. सनी देओलने जवान आणि पर्यटकांसोबत अनेक फोटोही क्लिक केले आहेत. सनी देओलसोबत सकीना म्हणजेच अमिषा पटेल आणि उदित नारायण देखील या फोटोंमध्ये दिसत आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल त्यांच्या चित्रपटामधील व्यक्तिरेखेच्या वेशभूशेत दिसत आहे. याशिवाय सनी देओलने त्यानंतर गोल्डन टेंपल दर्शन घेतले. यादरम्यान त्याच्यासोबत अमिषा पटेल दिसली नाही. आता सनी देओलचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सनी करत आहे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर २' हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सध्या तो त्याच्या 'गदर २' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटाचा ट्रेलर खूपच भारी आहे. हा चित्रपट २००१ मध्ये आलेल्या 'गदर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'गदर २' या चित्रपटात पुढील कहाणी दाखवण्यात येणार आहे. यासोबतच सनी आणि अमिषाची जबरदस्त केमिस्ट्री देखील रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'गदर' चित्रपटाची कथा : 'गदर' बद्दल सांगायचे तर हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळाची कहाणी आहे. ज्यामध्ये तारा सिंग आणि सकिना हे दोन वेगवेगळ्या धर्माचे पती-पत्नी वेगळे होतात. ज्यानंतर तारा सिंह आपल्या मुलाला पत्नीला घेऊन पाकिस्तानात जातो आणि प्रेमाच्या जोरावर संपूर्ण पाकिस्तान हादरवून टाकतो. 'गदर २' रिलीज होण्यापूर्वी, चित्रपट निर्मात्यांनी चाहत्यांना 'गदर' दाखवून संपूर्ण कथेची आठवण करून दिली आहे.

हेही वाचा :

  1. Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूझने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव...
  2. Lappu Sa Sachin Song : सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर तयार केले गाणे झाले व्हायरल...
  3. National Sisters Day 2023 : राष्ट्रीय भगिनी दिवसानिमित्त आपल्या बहिणीसह पाहा 'हे' सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपट...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.