ETV Bharat / entertainment

Suhana Khan : सुहाना खान अलिबाग पर्यटनस्थळाच्या प्रेमात पडली...कोट्यवधी खर्चून घेतला 'हा' निर्णय - द आर्चीज

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने मुंबईतील अलिबागमध्ये १.५ एकर शेतजमीन खरेदी केली आहे. ही जमीन तिने १२.९१ कोटी रुपयांनी विकत घेतली आहे.

Suhana Khan
सुहाना खान
author img

By

Published : Jun 23, 2023, 11:47 AM IST

मुंबई : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या तिच्या आगामी 'द आर्चीज' या बॉलिवूड डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, सुहाना तिच्या संपूर्ण टीमसह 'द आर्चीज' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी ब्राझीलमधील 'टुडम' (TUDUM) कार्यक्रमात गेली होती. तिथे सुहाना खानने चित्रपटातील तिच्या सहकलाकारांसोबत जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला. आता पुन्हा एकदा सुहाना खान प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सुहानाने १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची शेतजमीन घेतली आहे. तिने अलिबागच्या थल गावात १.५ एकर शेतजमीन १२.९१ कोटी रुपयांना विकत घेतली आहे.

सुहानाने घेतली जमीन : सुहाना खानने १ जून रोजी ही जमीन विकत घेतली आहे. त्याचबरोबर या जमिनीसाठी सुहानाने ७५ लाखांहून अधिक पैसे भरले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिबागच्या थल गावात ही शेतजमीन आहे, जी १.५ एकरमध्ये पसरली आहे. या जमिनीवर २२१८ चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे. सुहानाने ही जमीन अंजली, रेखा आणि प्रिया नावाच्या तीन बहिणींकडून विकत घेतली आहे. विशेष म्हणजे, शाहरुख खानकडे अलिबागमध्ये आधीच अनेक जमीन संपत्ती आहे, परंतु अद्याप या वृत्ताला शाहरुख आणि त्याच्या मुलीकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नाही किंवा अधिकृत वक्तव्य याबद्दल समोर आलेले नाही.

वर्कफ्रंट : सुहाना खान आणि शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सुहानाचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज' लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'द आर्चीज' या चित्रपटामध्ये सुहानासोबत अगस्त्य नंदा, खुशी कपूर , मिहीर आहुजा , वेदांग रैना, आणि युवराज मेंडा हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे.

वर्कफ्रंट : शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान और डंकी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात त शाहरुख खान पुन्हा एकदा वर्दीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान एका तरुण मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल आता चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तसेच दोन्ही चित्रपट यावर्षी रिलीजसाठी सज्ज आहेत.

हेही वाचा :

  1. Dholkichya Taalavar new season : नव्या लावणी सम्राज्ञीची निवड करण्यासाठी येतोय 'ढोलकीच्या तालावर'चा नवा हंगाम!
  2. Jawan stuntman praised SRK : 'जवान'च्या प्रत्येक अ‍ॅक्शननंतर शाहरुख स्टंटमॅनची करायचा विचारपूस
  3. Bawaal at the Eiffel Tower: वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'बवाल'चा आयफेल टॉवरवर होणार प्रीमियर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.