ETV Bharat / entertainment

launch of Jawan teaser: शाहरुखच्या जवान टीझरची प्रतीक्षा सुरू, जुलैच्या 'या' तारखांना होणार धमाका

author img

By

Published : Jun 28, 2023, 4:34 PM IST

शाहरुख खान याचा आगामी अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित जवान टीझरची जोरदार प्रतीक्षा सुरू आहे. यासाठी भव्य लॉन्चिंग सोहळा चेन्नई येथे आयोजित केला जाणार असून यासाठी जुलैमधील दोन तारखांवर काम सुरू आहे.

launch of Jawan teaser:
शाहरुखच्या जवान टीझरची प्रतीक्षा सुरू

मुंबई - शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवानचा टीझर रिलीज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट आणि त्याच्या प्रमोशनल साहित्याचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. शाहरुख खानने ट्विटरवरील त्याच्या अलीकडील आस्क एसआरके सेशनदरम्यान जवान टीझर तयार असल्याचे संकेत दिल्यापासून, चाहते त्याची प्रतीक्षा करत आहेत. लेटेस्ट घडामोडीनुसार निर्माते जवान टीझर लॉन्चसाठी दोन तारखांवर विचार करत असल्याचे समजते.

जुलैमधील या दोन तारखा होणार निश्चित - जवान टीझर जुलैमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे कारण निर्माते शाहरुख खानच्या अत्यंत अपेक्षित अ‍ॅक्शनर थ्रिलरसाठी दोन महिन्यांच्या प्रमोशनल गोष्टीमाठी देण्याचा विचार करत आहेत. यासाठी शाहरुख खान आणि अ‍ॅटली कुमार जवान टीझर रिलीज करण्यासाठी जुलैमध्ये दोन तारखांचा विचार करत आहेत. जवान टीझरच्या भव्य लॉन्चसाठी निर्माते ७ किंवा १५ जुलै या दोन्ही पैकी एक दिवस निवडणार आहेत. या टीझर लॉन्चसाठी खास पाहुणे आणि इतरांचा होकार निश्चित झाल्यानंतर तारीख जाहीर केली जाणार आहे. जवानचा टीझर चेन्नईमध्ये लॉन्च करण्यावर एकमत झाले असल्याचेही समजते.

जवान प्रमोशन स्ट्रॅटेजी - शाहरुख खानने पठाण चित्रपटाच्यावेळी आधी म्यूझिक आणि नंतर ट्रेलर लॉन्च केला होता. या स्ट्रॅटेजीचा त्यांना लाभही झाला होता. जवानसाठीही हीच स्ट्रॅटेजी वापरली जाण्याचा अधिक शक्यता गृहीत धरली जात आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे आणि पठाण नंतर २०२३ मधील सर्वात मोठ्या सिनेमॅटिक आकर्षणापैकी एक आहे. पॉवर-पॅक अ‍ॅक्शन एंटरटेनर असलेल्या या चित्रपटात शाहरूख खान वडील आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानच्या प्रॉडक्शन बॅनर रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे बँकरोल केलेल्या, जवानमध्ये तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत तर सान्या मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार करत आहे. आजवर त्याने निर्माण केलेले राजा राणी, थेरी, संगली बुंगली कढवा थोरे, मर्सल, बिगील, अंधघरम हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

हेही वाचा -

१. Satyaprem Ki Katha Advance Booking : सत्यप्रेम की कथाच्या आगाऊ बुकींगला चांगला प्रतिसाद

२. 72 Hoorain Trailer OUT : दहशतवाद्यांच्या जगाची काळीकुट्ट बाजू दाखवणारा 72 हुरैनचा ट्रेलर आऊट

३. Asin breaks silence on divorce: घटस्फोटाची चर्चा काल्पनिक आणि निराधार असल्याचा असिनचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.