ETV Bharat / entertainment

सोनू सूदचा दुबईत वाढदिवस साजरा, सिटी स्कायस्क्रॅपर बिल्डिंगवर झळकला फोटो - सोनू सूद दुबई

सोनू सूदने 30 जुलै रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला. आता त्याचा दुबईतून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये नामा-ग्रॅमी इमारतीमध्ये सोनू सूदचा फोटो प्रदर्शित करून चाहत्यांनी त्याचे स्वागत केले आहे.

सोनू सूदचा दुबईत वाढदिवस साजरा
सोनू सूदचा दुबईत वाढदिवस साजरा
author img

By

Published : Aug 2, 2022, 1:00 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेता आणि गरिबांचा मसिहा सोनू सूद याच्या दातृत्वाची संपूर्ण देशाला जाणीव आहे. कोरोनाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी देवदूत बनून जमिनीवर उतरलेला सोनू सूद त्या लोकांसाठी देवापेक्षा कमी नाही. अभिनेत्याने 30 जुलै रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला. या दिवशी अभिनेत्याचे हजारो चाहते अभिनेत्याची एक झलक घेण्यासाठी त्याच्या घराबाहेर आले होते. आता त्याचा दुबईतून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये नामा-ग्रॅमी इमारतीमध्ये सोनू सूदचा फोटो प्रदर्शित करून चाहत्यांनी त्याचे स्वागत केले आहे.

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सोनू सूद दुबईला पोहोचला, तिथे त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. शहरातील सिटी स्कायस्क्रॅपर बिल्डिंगमध्ये अभिनेत्याचा फोटो दाखवून चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. येथे सोनू सूदने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आणि चाहत्यांनीही सोनू सूदसोबत फोटोसाठी जोरदार पोझ दिली.

आता हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनू सूद गेल्या दोन वर्षांपासून न थांबता निस्वार्थपणे गरजूंच्या सेवेत गुंतला आहे. सोनूने अनेकांना नोकरी आणि अनेकांना घरे दिली आहेत.

त्याचबरोबर अनेक लहान मुले, महिला आणि वृद्धांवरही मोफत उपचार त्याने केले आहेत. सोनूच्या सेवेची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' मध्ये यशराज बॅनरखाली दिसला होता.

हेही वाचा - शाहरुख खानने वडोदरा स्टेशनवर आरओ प्लांटसाठी खर्चले 23 लाख रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.