ETV Bharat / entertainment

Sonu Sood wraps up Fateh : सोनू सूदने पूर्ण केले सॅन फ्रॅन्सिकोतील फतेहचे शुटिंग - सोनू सूदलेटेस्ट न्यूज

Sonu Sood wraps up Fateh : सोनू सूदचा महत्त्वकांक्षी चित्रपट 'फतेह' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये शुटिंग सुरू होतं. हॉलिवूडच्या निवडक तज्ञांच्या मदतीने हे शुटिंग सुरू होतं. सॅन फ्रॅन्सिस्कोचे शुटिंग पूर्ण झालं असल्याचं सोनूने चाहत्यांना कळवलं आहे.

Sonu Sood wraps up Fateh
सोनू सूदने पूर्ण केले सॅन फ्रॅन्सिकोतील फतेहचे शुटिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 12:27 PM IST

Updated : Sep 2, 2023, 1:16 PM IST

मुंबई - Sonu Sood wraps up Fateh अभिनेता सोनू सूद 'फतेह' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होतोय. नुकतेच त्याने या चित्रपटाचे सॅन फ्रॅन्सिस्को येथील शुटिंग शेड्यूल पूर्ण केलं. इन्स्टाग्रामवर त्याने 'फतेह'च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. शुटिंग पूर्ण झाल्याचा संदेशही त्याने यामधून चाहत्यांना दिला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत सोनू सूद क्लॅप बोर्डसह स्क्रिप्ट वाचताना दिसत असून टीमसोबत फोटोंना पोजही देताना दिसतोय. त्याच्या या फोटोवर प्रतिक्रियांसह चाहत्यांनीही इमोजींचा वर्षाव केलाय. शिवाय त्याला भरपूर प्रतिक्रियाही मिळतायत.

‘फतेह’ हा एक अ‍ॅक्शन-पॅक्ड रोमांचक चित्रपट आहे. या चित्रपटासाठी हॉलिवूडचे स्टंटमन काम करत असल्यामुळे चित्रपटाबाबत आधीच चर्चा रंगली आहे. आता सॅन फ्रान्सिस्को मधलं शूटिंग पूर्ण झाल्याने 'फतेह' टीममध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. कोविड साथीच्या काळात लोकांनी अनुभवलेल्या सायबर गुन्ह्याच्या सत्य कथेवर आधारित 'फतेह' चित्रपटाची कथा आहे.

वैभव मिश्रा दिग्दर्शित 'फतेह' चित्रपटात सोनू सूदसह जॅकलीन फर्नांडिस, शिवज्योती राजपूत आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, रिसर्च टीम, अ‍ॅक्शन आणि कोरिओग्राफीसाठी हॉलिवूडची टीम काम करतेय. यासाठी सर्वोत्कृष्ट लोकांची निवड करण्यात आली आहे. सोनू सूदसाठी हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचं मानलं जात आहे.

सोनू सूदने कोविडच्या काळात लोकांसाठी भरपूर परोपकारी काम केले. प्रवासी कामगारांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. यासाठी तो लोकांच्या मदतीसाठी जाण्यास सदैव तत्पर होता. मात्र त्याच्या नावाचा वापर करुन लोकांची फसवणूक करणारेही काही महाभाग त्याच्या निदर्शनास आले. खोटी कर्ज देणं, सोनू सूदला भेटण्याचे आश्वासन देणे ,असे प्रकार उघडकीस आले. तेव्हा सोनूला त्याला जाणवलं की सायबर क्राईम हे देशातील सर्वात मोठे फसवणुकीचं जाळं आहे. याच अनुभवावर आधारित 'फतेह' चित्रपटाची कल्पना त्याला सुचली आणि त्यावर त्याने अहोरात्र मेहनत केली आहे. 'फतेह' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी माहिती सोनू सूदने दिलीय.

हेही वाचा -

१. Gadar 2 Vs OMG 2 Collection Day 23 : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'च्या कमाईत झाली घट...

२. Hrithik Roshan and Saba Azad: सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबा आझाद झाले ट्रोल...

३. Vijay Varma schools paparazzi : मर्यादा ओलंडणाऱ्या पापाराझीचा विजय वर्माने घेतला क्लास, तमन्नानेही सांगितली खटकणारी गोष्ट

Last Updated : Sep 2, 2023, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.