ETV Bharat / entertainment

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार - आनंद आहुजाची प्रतिक्रिया

अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.

Sonam Kapoor
अभिनेत्री सोनम कपूर
author img

By

Published : Jun 1, 2023, 3:56 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही फार दिवसांपासून रूपेरी पडद्यावर दिसली नाही. सोनमने अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा ती कामावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी, तिने शेअर केले की ती, लवकरच रूपेरी पडद्यावर परत येणार आहे. तिने शेअर करताना लिहले, विजेंद्र भारद्वाज आणि प्रबुद्ध यांच्यासोबतच्या मी 23 वर्षांची असताना शुटिंग केली, मला त्याच्याबरोबर काम करायला फार आवडले. मला कॅमेऱ्यासमोर येण्याची आठवण येते आणि या हिवाळ्यात परत येण्याची मी वाट पाहू शकत नाही! माझे तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. एक्स एक्स असे तिने पोस्टमध्ये लिहले आहे. म्हणजे लवकरच सोनम ही आपल्याला रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.

सोनमच्या पोस्टवर प्रतिक्रया : या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तिचे पती आनंद आहुजाने कमेंट करत इमोजीसह लिहले, 'अजूनही तसंच दिसतंय!! नेहमी क्लासिक' तसेच त्यानंतर सोनमचे वडील आणि अभिनेता अनिल कपूर यांनी लिहिले, 'प्रभूदासच्या कामाचे प्रचंड चाहते.. आजही फ्रेश आणि कलात्मक दिसतात.. क्लासिक फोटो' तसेच सोनमच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट केले आहे. काही तिच्या चाहत्याने तिला सुंदर म्हटले आहे. सोनमने अलीकडेच किंग चार्ल्स तिसरा (III) च्या राज्याभिषेक कार्यक्रमला उपस्थित राहून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. याबद्दल सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती.

बी-टाऊनमधील सर्वात मोहक जोडपे : सोनमने कॉमनवेल्थमध्ये राष्ट्राच्या विविधतेला जोडणाऱ्या एकतेवर भाष्य केले होते . तसेच या कार्यक्रमात 56 देशांने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात 70-पीस ऑर्केस्ट्रासह आयकॉनिक गाण्याची हायर लव्हची आधुनिक सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सोनमने आपल्या भाषणाची सुरुवात 'नमस्ते' ने केली होती. त्यामुळे ती बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे असे समजण्यात आले होते. सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी आनंद आहुजासोबत लग्न केले. तसेच सोनम आणि आनंद हे बी-टाऊनमधील सर्वात मोहक जोडप्यांपैकी एक आहे. सोनमला बॉलिवूडमध्ये फॅशनसाठी ओळखले जाते. शिवाय ती अनेक वादग्रस्त विधानामुळे देखील चर्चेत असते.

हेही वाचा :

  1. Sonakshi Sinha : 'दहाड'मधील एका सीनने सोनाक्षीच्या मनाला बसला होता हादरा
  2. Priyanka chopra reaction : प्रियांका चोप्राने पती निक जोनासच्या 'द गुड हाफ' या चित्रपटावर दिली प्रतिक्रिया
  3. Sara Ali Khans Reply to Trollers : मंदिर भेटीनंतर ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानचे चोख प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.