ETV Bharat / entertainment

Sidharth Malhotra Reeact : कियारा अडवाणीच्या 'सत्यप्रेम की कथा'च्या ट्रेलरवर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया - सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलिवूड कलाकार कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ द्वारे प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहेत. कियाराचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत चित्रपटाच्या संपुर्ण टिमला शुभेच्छा दिल्या आहे.

Sidharth Malhotra and Kiara Advani
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा
author img

By

Published : Jun 6, 2023, 5:28 PM IST

Updated : Jun 6, 2023, 6:01 PM IST

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर हा मंगळवारी ५ जूनला प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पत्नी कियाराला आणि तिच्या टिमला शुभेच्छा दिल्या आहे. सिद्धार्थ कॅप्शनमध्ये लिहले, ट्रेलर खूप सुंदर आहे, (हार्टचा वापर करून कियाराला इथे म्हटले आहे), चित्रपटात तू साकारलेल्या ‘कथा’ पात्राला पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. ‘सत्यप्रेम की कथा’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. त्यानंतर सिद्धार्थ काहीजणांना या पोस्टमध्ये टॅग केले आहे. सिद्धार्थने पुन्हा पोस्ट शेअर करत हार्ट आणि इमोजीसह धन्यवाद बेब' असेही लिहिले.

सत्यप्रेम की कथा : या चित्रपटाची कहाणी चांगलीच हटके आहे. चित्रपटात कार्तिक कियाराला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असताना तिला लग्नासाठी विचारतो. दोघांचे लग्न होते. त्यानंतर कियारा आणि कार्तिकला एकत्र राहताना अनेक अडचणीचा सामना करवा लागतो. ट्रेलरच्या व्हिडिओमध्ये गाण्यांची झलकही पाहायला मिळाली आहे. लग्नानंतरच्या प्रेमाची कल्पना या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अलीकडेच, 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपट निर्मात्यांनी 'नशीब से' हे गाणे प्रदर्शित केले होते, ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. पायल देव यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे विशाल मिश्रा यांनी सुंदर गायले आहे. हे गाणे मंत्रमुग्ध करणारे आणि मनमोहक आहे. या गाण्यात कार्तिक आणि कियारा यांची केमिस्ट्री सुंदरपणे दाखवण्यात आली आहे

Sidharth Malhotra Reeact
Sidharth Malhotra Reeact

स्टारकास्ट : तसेच या चित्रपटात सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मिते सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, सिद्धार्थच्या कामबद्दल बोलायचे झाले तर तो 'योधा'मध्ये दिशा पटानी आणि राशि खन्ना दिसणार आहे. हा चित्रपट 15 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Sidharth Malhotra Reeact
Sidharth Malhotra Reeact

वर्कफ्रंट : याशिवाय, तो इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमधून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित, या वेब सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. ही वेब सीरीज अ‍ॅमेझोन प्राईमर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजची अधिकृत स्ट्रीमिंग तारीख अद्याप निश्चित झाली नाही आहे. दुसरीकडे, कियारा ही अभिनेता राम चरण सोबत गेम चेंजरमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. Adipurush team :आदिपुरुष टीम प्रत्येक चित्रपटगृहात यासाठी एक सीट ठेवणार राखीव, जाणून घ्या कारण
  2. Swara Bhaskar gave good news : स्वरा भास्करने सोशल मीडियावर दिली गुड न्यूज
  3. Box Office Collection Day 4 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमी केली कमाई

Last Updated : Jun 6, 2023, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.