ETV Bharat / entertainment

Siddharth and Kiara public appearance: सिद्धार्थ, कियारा लग्नानंतर पती पत्नी म्हणून पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसले - Sid Kiara was seen for the first time

नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे 7 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या शाही विवाहानंतर सार्वजनिकपणे अधिकृत जोडपे म्हणून पहिल्यांदा एकत्र दिसले. त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची झुंबड उडाली होती.

Siddharth and Kiara public appearance
Siddharth and Kiara public appearance
author img

By

Published : Feb 9, 2023, 11:28 AM IST

मुंबई - नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नानंतर दिल्लीला परतले आहे. ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील सुर्यगढ पॅलेसमध्ये शाही विवाह सोहळा पार पडल्यानंतर ही जोडी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसली.

विवाहानंतर पहिल्यांदाच दिसले सिड कियारा - विरल भयानीने त्याच्या पापाराझी इंस्टाग्रामवर जैसलमेर विमानतळावरून निघताना सिद्धार्थ आणि कियाराची क्लिप शेअर केली. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ कारमधून उतरताना दिसत आहे आणि नंतर कियाराला बाहेर येण्यास मदत करतो. यावेळी पापाराझींनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत व फोटोंना पोज देत हे जोडपे विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना दिसले. यावेळी सिद्धार्थ कियाराच्यासोबतीने अतिशय आनंदी दिसत होता. नवीन नवरीने कपाळावर सिंदूर आणि गुलाबी लग्नाच्या बांगड्या घातलेल्या होत्या. दोघांनीही नेहमीचे साधे कपडे परिधान केले होते व डोळ्यावर गॉगल घातला होता. पापाराझी शिवाय अनेक स्थानिक नागरिक व चाहते यावेळी विमानतळावर मोठ्या संख्येने हजर होते.

कियाराचा सिद्धार्थच्या घरी गृहप्रवेश - दिल्लीतील सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी नवविवाहित जोडप्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. स्ध्राथच्या घराला रोशनाई करण्यात आली होती. यावेळी जोडपे लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मॅचिंग करताना दिसले. घराबाहेरही पापाराझींनी कॅमेऱ्यासह गर्दी केली होती. नववधू कियारा सिद्धार्थ मल्होत्राचा जल्लोषात गृहप्रवेश पार पडला. यावेळी सिद्धार्थचे कुंटुंबीय व नातेवाईक हजर होते. सिद्धार्थच्या घराबाहेर उपस्थित पापाराझींची काळजी मल्होत्रा कुटुंबाने घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व पापाराझींना उत्तम स्वादिष्ठ मिठाईचे वाटप सिद्धार्थ आणि कियाराने स्वतःच्या हाताने केले. 7 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियारा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकले. हा एक जिव्हाळ्याचा सोहळा होता, ज्यामध्ये करण जोहर, मनीष मल्होत्रा, जुही चावला, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांसारखे उद्योगातील काही मित्र दिसले होते.

पापाराझी म्हणजे काय? - ढोबळ मानाने मुक्त फोटो ग्राफर किंवा प्रेस फोटोग्राफर जो एखाद्या व्यक्तीचा फोटो घेण्यासाठी त्याला अनुसरण करतो. एक स्वतंत्र छायाचित्रकार जो ख्यातनाम व्यक्तींचा फोटो घेण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करतो, त्यालाही आपण पापाराझी म्हणू शकतो. तर या मायानगरी मुंबईत सेलेब्रिटींचा वावर नित्याचा असतो. शुटिंगच्या कामानिमित्य किंवा सुट्टी निमित्य सेलेब्रिटी विमानतळावर नेहमी अवतरत असतात. साधारणपणे डेस्टीनेशन वेडिंग, सेलेब्रिटी वेडिंग रिसेप्शन्स, शुटिंग स्टुडिओ फ्लोअर्स, रिआलिटी शोजचे स्टुडिओ, सेलेब्रिटी जीम्स, पंचतारांकित हॉटेल्स, जुहू आणि मलबार हिल्समधील आलिशान घरे अशा ठिकाणी सेलेब्रिटी नेहमी नजरेस पडतात. असे सेलेब्रिटी दिसल्यास पूर्वी लोक त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावत असत. आता त्याऐवजी लोक सेल्फीचा आग्रह धरतात. मात्र कोणता सेलेब्रिटी कोठे अवतरणार आहे, याची खबर ठेवणारेही मुंबईत कमी नाहीत. अशा सेलेब्रिटींना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपडणाऱ्या अशा हौशी फोटोग्राफर्सना पापाराझी या नावाने ओळखले जाते.

हेही वाचा - Paparazzi diary: दिशा पटानी, आर्यन खान, आदित्य रॉय कपूरसह सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.