ETV Bharat / entertainment

Tiger Vs Pathaan : टायगर विरुद्ध पठाणसाठी शाहरुख खान आणि सलमान खानला दिग्दर्शित करणार सिद्धार्थ आनंद

यशराज फिल्म्स गुप्तहेर विश्वाच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे, यश चोप्राने पठाणचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याच्यावर टायगर Vs पठाण मधील बॉलिवूडचे दोन सर्वात मोठे स्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. हा आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे आणि फेब्रुवारी 2024 मध्ये तो पूर्णत्वास जाईल.

author img

By

Published : Apr 6, 2023, 1:43 PM IST

टायगर विरुद्ध पठाण
टायगर विरुद्ध पठाण

मुंबई - बॉलिवूड जासूस विश्व बहरत चालले असून टायगर, वॉर आणि पठाणच्या यशाने या जगताचा पसारा वाढला आहे. नुकतेच ज्युनियर एनटीआर या साऊथ स्टारची एन्ट्री वॉर २ मध्ये होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर गुप्तचर विश्वातील आणखी एका चित्रपटाने दिग्दर्शकाच्या पदासाठी चेहरा लॉक केला आहे. टायगर विरुद्ध पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे, जो पठाणच्या ऐतिहासिक यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात मोठे सुपरस्टार - शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील जबरदस्त सामना प्रेक्षक पाहणार आहेत.

टायगर विरुद्ध पठाण - नवीन बदलाबद्दल बोलताना एका अनुभवी ट्रेड स्रोताने सांगितले की, निर्मात आदित्य चोप्राचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदवर टायगर विरुद्ध पठाण या चित्रपटात याआधी कधीही न पाहिलेले भव्य दृश्य सादर करण्यासाठी प्रचंड विश्वास आहे. सिद्धार्थला शाहरुख खान आणि सलमान यांच्या निमित्ताने त्याला त्याच्या स्वप्नातील कलाकार मिळत आहेत. करण अर्जुन चित्रपटानंतर सलमान खान आणि शाहरुख खान हे दोन सुपरस्टार सिद्धार्थच्या या चित्रपटात पूर्ण क्षमतेने भूमिका साकारणार आहेत.

आदित्य चोप्राची सिद्धार्थवर मोठी जबाबदारी - यापूर्वी, सिद्धार्थचे चाहते त्याने वॉर 2 चे दिग्दर्शन न केल्यामुळे निराश झाले होते. त्याच्या 2019 च्या ब्लॉकबस्टर वॉर चित्रपटचा दिग्दर्शनाचा सीक्वल, जेव्हा अयान मुखर्जीला दिग्दर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. परंतु असे दिसते की निर्माता आदित्य चोप्रा सिद्धार्थवर एक मोठी जबाबदारी सोपवत आहे. पठाण मधील क्रॉस-ओव्हर सीनमध्ये शाहरुख आणि सलमान यांनी कमाल केली होती.

नवा इतिहास घडवण्याच्या तयारीत यशराज फिल्म्स - स्त्रोताने पुढे दिलेल्या माहितीनुसार यशराज फिल्म्स वॉरच्या निमित्ताने त्यांची संपूर्ण सर्जनशील शक्ती भारतीय चित्रपटाच्या इतिहासात एक रेकॉर्ड-स्मॅशिंग ब्लॉकबस्टरसाठी वापरणार आहे. काळाचा विचार करता यशराजच्या गुप्तचर विश्वाची सुरुवात 2012 मध्ये झाली जेव्हा सलमान खानने एक था टायगरमध्ये टायगरची जबाबदारी स्वीकारली होती. 2017 मध्ये, सलमानने टायगर जिंदा है मधील सुपर-स्पायच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली. त्यानंतर 2019 मध्ये, हृतिक रोशनने वॉरमधील सुपर-स्पाय कबीर म्हणून गुप्तचर विश्वात प्रवेश केला. पठाणसह, शाहरुख खानने सुपर-एजंट पठाण म्हणून यशराजच्या गुप्तचर विश्वात प्रवेश केला आणि एक प्रचंड जागतिक ब्लॉकबस्टर दिला. तथापि, या विश्वातील हेरांच्या क्रॉसओव्हरची सुरुवात फक्त 'पठाण' पासून झाली, जी मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम सिनेमॅटिक क्षणांपैकी एक म्हणून इतिहासाच्या पानांमध्ये नोंद केली जाईल.

हेही वाचा - Raveena Tandon Padma Shri : रवीना टंडनने राजामौलीसोबत दिली पोज, पाहा रवीना व कीरवाणींचे संस्मरणीय फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.