ETV Bharat / entertainment

करण जोहरनं केली 'शो टाइम' वेब सीरीजची घोषणा ; पोस्ट केली शेअर - वेब सीरीज

Showtime : निर्माता करण जोहरची आगामी वेब-सीरीज 'शो टाइम'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या वेब सीरीजमध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Showtime
शो टाइम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 5:32 PM IST

मुंबई - Showtime : निर्माता करण जोहरनं 2023 मध्ये त्याची आगामी वेब-सीरीज 'शो टाइम'ची घोषणा केली आहे. करण जोहरनं आज 20 डिसेंबर रोजी त्याच्या नवीन वेब-सीरीज 'शो टाईम' चा टीझर रिलीज केला आहे. 'शो टाइम'च्या टीझरमध्ये कलाकारांचं फर्स्ट लूक देखील दाखवलं गेलं आहे. या वेब-सीरीजमध्ये इमरान हाश्मी, मौनी रॉय, नसीरुद्दीन शाह, साऊथ अभिनेत्री श्रिया सरन, राजीव खंडेलवाल, राधिका मदन यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. सिनेमाच्या पडद्यामागची गोष्ट सांगण्यासाठी ही मालिका येत आहे. 'शो टाइम' या वेब-सीरीजमध्ये बॉलिवूड स्टार्सचे स्टारडम, नेपोटिझम, आउटसाइडर, इनसाइडर आणि बड्या स्टार्ससाठी उभारण्यात आलेले पीआर नेटवर्क याबद्दल दाखविण्यात आलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'शो टाईम'चा टीझर प्रदर्शित : या वेब-सीरीजमध्ये प्रत्येक पात्राचं लूक सशक्त आणि डॅशिंग दिसत आहे. दरम्यान करण जोहरनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वेब-सीरीजचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टवर त्यानं लिहिलं, ''लाइट कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या जगात आपले स्वागत आहे, पॉवरफुल संघर्षात गुंतलेलं 'शो टाइम' ही एक वेब सीरिज आहे, जी सीमारेषा आखेल... ही रेखा ओलांडण्यासाठी ही मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर 2024 मध्ये प्रसारित होईल''. करणनं सध्या या वेब सीरीजच्या रिलीजच्या डेटचा खुलासा केलेला नाही. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या 'शो टाइम' या मालिकेचे दिग्दर्शन मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांनी केलं आहे. 'शो टाइम'चे निर्माते सुमित रॉय करण जोहर,अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा, मिहिर देसाई आहेत.

करण जोहरनं शेअर केली पोस्ट : 'शो टाईम' या वेब सीरीजचं लेखन सुमित रॉय, लारा चांदनी, मिथुन गंगोपाध्याय यांनी केलं आहे. या वेब सीरीजला संगीत आनंद भास्कर यांनी दिलंय. दरम्यान या टीझरमध्ये इमरान हाश्मी असं म्हणताना दिसतो की, घराणेशाहीच्या मुखवट्यामागे, शेवटी प्रत्येक आउटसाइडर व्यक्तीला इनसाइडर बनायचे आहे. त्यानंतर पुढं नसीरुद्दीन शाह म्हणतो, सिनेमा हा व्यवसाय नाही, हा धर्म आहे. 'शो टाईम'चा टीझर पाहून आता अनेकजन खूप उत्सुक आहेत. करणनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''करण तुझी ही वेब सीरीज खूप सुंदर असेल''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''इमरान हाश्मीचा अभिनय खूप सुंदर आहे'', अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. सोहेल खानचा वाढदिवस साजरा केल्यावर सलमान खान पॅप्सवर चिडला, पाहा व्हिडिओ
  2. 'धूम 3'ला आज 10 वर्षे पूर्ण , आमिर खान स्टारर खलनायकानं बॉक्स ऑफिसवर उडवली होती खळबळ
  3. दुबईत 'डंकी'चं जोरदार प्रमोशन, ड्रोन शोमध्ये साकारली किंग खानची सिग्नेचर पोज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.