मुंबई - Shilpa Shetty Ganesh Immersion : गणपती बाप्पाचं गणेश चतुर्थीला आगमन झालं आणि दिड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन देखील झालं. यावर्षी घरघुती गणपतींची संख्या वाढलेली दिसते. गणेश चतुर्थी उत्सव हा सर्वांसाठी खास असतो ज्यात बॉलिवूड सेलेब्रिटी देखील मोडतात. शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान आणि करीना कपूर खान, श्रद्धा कपूर, तुषार कपूर, सोनू सूद, मनीष पॉल, गोविंदा, माधुरी दीक्षित नेने असे अनेक स्टार्स आपल्या घरी गणपती बाप्पा आणतात. शिल्पा शेट्टी कुंद्रा देखील आपल्या जुहू येथील निवासस्थानी बाप्पाची स्थापना करते आणि गाजतवाजत विसर्जन करते.
शिल्पा मीडिया व पापाराझींची फेव्हरेट आहे. तिच्या सर्व मूव्ह्स आणि कार्यक्रम ते आवर्जून कव्हर करतात. अगदी तिचा पती राज कुंद्रा जेलमध्ये होते तेव्हादेखील तिच्या घराभोवती पापाराझींचा वेढा असायचा. राज कुंद्रा सध्या बेलवर बाहेर आहे परंतु तो गणपती सोहळ्यात आवर्जून पुढाकार घेताना दिसतो. कटाक्षानं तो आपला चेहरा कॅमेराच्या समोर उघडा ठेवत नाही. याहीवर्षी त्यांच्या घरातील गणपती विसर्जनावेळी त्याने आपला चेहरा टॉवेलनं झाकून ठेवला होता. तरीही ही विसर्जन मिरवणूक जोशात पूर्ण झाली.
यावर्षी शिल्पानं खास नाशिकच्या ऑल गर्ल्स ढोल बँडला निमंत्रण दिलं होतं. त्यात २१ महिला सहभागी होत्या. त्यांनी पारंपारिक तालवाद्यांच्या माध्यमातून संगीत वाजवीत हा विसर्जन सोहळा अजून खास केला. शिल्पाने नऊवारी साडी नेसली होती आणि ती, तिचा मुलगा वियान आणि बहीण शमिता यांनी ढोल ताशांच्या रिदमवर नृत्याचा ताल धरला होता. २१ प्रतिभावान महिलांचा सहभाग असलेल्या ढोल ताशांच्या पथकाने या मिरवणुकीला चार चांद लावले.
शिल्पा शेट्टी कुंद्रा साठी हा गणेशोत्सव खास आहे कारण तिची प्रमुख भूमिका असलेला 'सुखी' हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजे २२ सप्टेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनल जोशी यांनी केलं असून त्याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा यांनी केली आहे. शिल्पा शेट्टी कुंद्राला अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार, कुशा कपिला या कलाकारांची साथ लाभली आहे. तसेच शिल्पा शेट्टी कुंद्रा रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहे तसेच ती 'के डी' नावाच्या कन्नड चित्रपटात सुद्धा दिसणार आहे.
हेही वाचा -
१. Sara Ali visited Kartiks home : कार्तिक आर्यनच्या घरी सारा अली खान, तर्क-वितर्कांना उत
३. Womens Reservation Bill : महिला किती शक्तिशाली आहेत याची जाणीव त्यांना नसते : आशा भोसले