मुंबई - अभिनेत्री-गायिका शिबानी दांडेकर ही बॉलिवूड जगतातील सर्वात छान कलाकारांपैकी एक आहे. तिने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर पती फरहान अख्तरचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चाहत्यांसाठी फरहानच्या बालपणीच्या सुंदर फोटोची भेट दिली आहे. फोटोत फरहानने कॅमेर्यासमोर निरागस दिसत असून त्याने प्रिंटेड टी शर्ट घातला होता.
दरम्यान, जवळपास तीन वर्षे डेट केलेले फरहान आणि शिबानी यांनी 19 फेब्रुवारी रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत खंडाळा येथील फरहानच्या फॅमिली फार्महाऊसवर लग्न केले होते.
दिवसभर चाललेल्या या विवाह सोहळ्याला फराह खान, रिया चक्रवर्ती, सतीश शाह, आशुतोष गोवारीकर आणि रितेश सिदवानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हृतिक रोशननेही त्याचे आई-वडील राकेश आणि पिंकी रोशनसोबत लग्नाला हजेरी लावली होती.
हेही वाचा - Shamshera trailer: जमातीच्या स्वातंत्र्यासाठी अथकपणे लढणाऱ्या 'शमशेरा'चा भव्य ट्रेलर