ETV Bharat / entertainment

Sher Shivraj Movie Hits Box Office : ‘शेर शिवराज'मुळे बॉक्स ऑफिसवर 'हाऊस फुल्ल' चे बोर्ड

author img

By

Published : Apr 25, 2022, 2:25 PM IST

मूठभर मावळ्यांच्या मदतीने क्रूरकर्मा अफजलखानाशी (Sher Shivraj) दिलेल्या असामान्य झुंजीची संघर्षमय गाथा अनेकांना भावली. महारांजांची रणनीती त्यांच्या शिलेदारांचा गनिमी कावा या सगळ्या गोष्टी अचूकपणे यात दाखवल्या आहेत.

Sher Shivraj
Sher Shivraj

मुंबई : लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक चित्रपट बनविण्याचे शिवधनुष्य उचलले. आणि मराठी रुपेरी पडद्यावर कमाल केली. प्रत्येकाला इतिहासाची गोडी निर्माण होईल अशा पद्धतीने चित्रपटांची चित्रमालिका सुरु केली. या सर्व चित्रपटांनी एक वेगळा इतिहास रचला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटांच्या यशानंतर शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' हे चौथे चित्रपुष्प नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर व समीक्षकांनीही ‘शेर शिवराज'ला पसंतीची पावती दिली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून तसेच परदेशांतून सगळ्याच वयोगटांतील प्रेक्षकांनी चित्रपटाचे जोरदार स्वागत केले आहे. शुक्रवारी ३०० चित्रपटगृहांच्या ७०० शोज मधून सुरु झालेली ही घोडदौड शनिवारी ४५० चित्रपटगृहांच्या १२०० शोजपर्यंत पोहचली आहे. याखेरीज परदेशातील यूएसए, ऑस्ट्रेलिया,आर्यलॅंड, युके, फिनलॅंड, घाना, नायजेरिया, सौदी अरेबिया, कुवेत, ओमेन, बहारीन, कतार, युएइ चित्रपटगृहांमध्येही प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. अमेरिकेतील शुक्रवार आणि शनिवारच्या शोजलाही जोरदार प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे 'शेर शिवराज' च्या टीमने दाखवून दिले आहे.

शिवरायांचा जीवनप्रवास उलगडणार
मूठभर मावळ्यांच्या मदतीने क्रूरकर्मा अफजलखानाशी दिलेल्या असामान्य झुंजीची संघर्षमय गाथा अनेकांना भावली. महारांजांची रणनीती त्यांच्या शिलेदारांचा गनिमी कावा या सगळ्या गोष्टी अचूकपणे यात दाखवल्या आहेत. ॲक्शन सीन, ताल धरायला लावणारं संगीत, व्हीएफक्स अशा अनेक गोष्टी 'शेर शिवराज' च्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. या सिनेमाला मुंबई, पुणे व इतर शहरामध्ये दमदार ओपनिंग मिळाले असून प्रेक्षकांचा ओघ सतत सुरू आहे. अनेक शहरांत प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ‘शेर शिवराज'चे शोज् वाढवले गेलेत. रसिकांनी हा चित्रपट उचलून धरल्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त करतानाच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे समाधान ही व्यक्त केले. चित्रपटगृहात ‘जय शिवराय’ चा जयघोष करीत सर्व चित्रपटगृहे ’दणाणून गेली आहेत.
हेही वाचा - My Dads Wedding : लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'माय डॅड्स वेडिंग'चे संपूर्ण शूटिंग होणार लंडनमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.