मुंबई - अभिनेत्री-गायिका शहनाज गिलने सोशल मीडियावर गुलाबी आणि पांढरा लेहेंगा घातलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. शहनाजने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केले आहे. यामध्ये ती अमर जलाल आणि आयपी सिंग यांनी गायलेल्या नशा या पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. शहनाजचा हा नवीन लूक तिच्या उमंग 2022 मधील परफॉर्मन्ससाठीचा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मुंबई पोलीस निधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या उमंग २०२२ मधील स्टार-स्टडेड गालामध्ये तिच्या पदार्पणाच्या लाइव्ह डान्स परफॉर्मन्ससाठी तिने परिधान केलेल्या ब्लिंगी पोशाखात अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
शहनाजने व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच, तिच्या चाहत्यांनी तो सोशल मीडियावर ट्रेंड केला आणि तिच्या कमेंट विभागात कौतुकाचा पूर आला. दरम्यान, रविवारी मुंबई पोलिसांच्या उमंग या वार्षिक कार्यक्रमात शहनाजने तिच्या कामगिरीने स्टेजला आग लावली. शहनाजने चिकनी चमेली आणि नच पंजाबन यासह अनेक गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स दिले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या सोहळ्यात तिने स्टेजवरून खाली उतरून कॉमेडियन जॉनी लीव्हर आणि इतरांना अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या जुग जुग जीयो चित्रपटातील प्रसिद्ध नच पंजाबन हुक स्टेप केल्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिच्या अभिनयातील विशिष्ट क्षण इंटरनेटवर फिरत आहेत. वरुणने शहनाजचा व्हिडिओ देखील शेअर केला आणि ट्विट करुन तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे. शहनाज परफॉर्म करण्यापूर्वी म्हणाली, "हा माझा पहिलाच परफॉर्मन्स आहे. तुम्हाला आवडला तर धन्यवाद. नाही आवडला, तरीही धन्यवाद."
या सोहळ्यामध्ये सुपरस्टार शाहरुख खाननेही त्याच्या फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटातील आय एम द बेस्ट गाण्यावर परफॉर्मन्स केला. शहनाज आणि शाहरुख व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, फराह खान, रवीना टंडन, जावेद अख्तर आणि फरहान अख्तर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हेही वाचा - आफरीन अल्वीने ग्लॅमरस अवतारात वाढवले तापमान - पाहा फोटो