ETV Bharat / entertainment

Shamshera trailer: जमातीच्या स्वातंत्र्यासाठी अथकपणे लढणाऱ्या 'शमशेरा'चा भव्य ट्रेलर - समशेरा थरारक अॅक्शन

रणबीर कपूर आणि संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'शमशेरा'चा जबरदस्ट ट्रेलर रिलीज झाला आहे. करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित, हा चित्रपट 1800 च्या दशकात बेतलेला आहे आणि ब्रिटीशांपासून त्यांच्या हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका डाकू जमातीची कथा आहे. रणबीर समशेराच्या भूमिकेत असून संजय दत्त क्रूर दरोगा शुध्द सिंह साकारत आहे. शमशेरा आणि दरोगामध्ये एक जबरदस्त संघर्ष कथानकात पाहायला मिळतो.

Shamshera trailer
Shamshera trailer
author img

By

Published : Jun 24, 2022, 1:03 PM IST

मुंबई - संजू चित्रपटाच्या अनेक वर्षानंतर रणबीर कपूर शमशेरा या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. रणबीर कपूर स्टारर 'शमशेरा' चित्रपटाचा भव्य ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ट्रेलर पाहताना रणबीर साकारत असलेला जबरदस्त डाकू समशेरा थरारक अॅक्शन करताना दिसतो. या पीरियड ड्रामामधील त्याच्या अभिनयाने रणबीरला पुन्हा एकदा चांगले यश मिळेल असे ट्रेलर पाहून वाटते.

गुलामीच्या जोखडात अडकलेल्या बांधवांना मुक्तीचा मार्ग दाखवणारा, श्रीमंतांना लुटणारा आणि आपल्या नावाची दहशत निर्माण करणाऱ्या शमशेराची ही अद्भूत कथा आहे. या शमशेराच्या समोर सर्वजण हादरले आहेत आणि अशावेळी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी दरोगा शुध्द सिंह विडा उचलतो. त्यानंतर शमशेरा आणि दरोगामध्ये एक जबरदस्त संघर्ष कथानकात पाहायला मिळतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रणबीर कपूर आणि संजय दत्तची रोमांच वाढवणारी व्यक्तिरेखा ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. हा चित्रपट यावर्षी 22 जुलैला रिलीज होणार आहे.

लॉकडाऊनमुळे लटकला होता चित्रपट - रणबीर कपूरचे चित्रपट चार वर्षांनंतर कमबॅक करत आहेत. या वर्षी त्याचा 'ब्रह्मास्त्र' (9 सप्टेंबर 2022) हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधी रणबीर कपूर या वर्षी 22 जुलैला रिलीज होणाऱ्या 'शमशेरा' चित्रपटात जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते रणबीरच्या या दोन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा - वाढदिवसाच्या निमित्ताने अर्जुन कपूर मलायका अरोरासोबत पॅरिसला रवाना पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.