मुंबई - रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'शमशेरा' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला त्याच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाचे कलाकार रणबीर आणि वाणी कपूर चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशा परिस्थितीत आता चित्रपट निर्मात्यांनी शमशेरा चित्रपटाचा टायटल ट्रॅकही रिलीज केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
उत्साहाने भरलेल्या गाण्यात रणबीरची दिलखेचक शैली समोर आली आहे. हा चित्रपट 22 जुलै (2022) रोजी रिलीज होणार आहे. गाणे सुरू होते - खंजर है पीठ में गहरा, घना चाहे अंधेरा फिर भी ज़िद पे ज़िंदा जो कहलाए वो शमशेरा...
रणबीर आणि वाणी 'शमशेरा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यशराज बॅनरच्या या चित्रपटाचा ट्रेलर २४ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरपासून ते संजय दत्तपर्यंत सर्वांची दमदार व्यक्तिरेखा पाहायला मिळाली. रणबीर कपूर पहिल्यांदाच इतक्या वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपटातील रणबीरच्या पात्राचे नाव शमशेरा आहे आणि संजय दत्तच्या पात्राचे नाव दरोगा शुद्ध सिंह आहे. या चित्रपटातील वाणीच्या व्यक्तिरेखेचे नाव सोना आहे. संजय दत्तच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये त्रिपुंड त्याच्या कपाळावर दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य दिसत होते. शमशेरा या चित्रपटाद्वारे रणबीर कपूर तब्बल चार वर्षांनी चित्रपटात पुनरागमन करत आहे. हा अभिनेता शेवटचा संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'मध्ये दिसला होता. 'शमशेरा'नंतर तो 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पत्नी आलिया भट्ट दिसणार आहे.
हेही वाचा - मला आता स्पोर्ट्स बायोपिक्स मधून ब्रेक घायचा आहे : तापसी पन्नू