मुंबई - सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरू आहे. आज १३ फेब्रुवारी हा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. किस डे व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी येतो. प्रेम करणाऱ्यांसाठी हा दिवस खूप खास असतो. या दिवशी प्रेमळ जोडपे एकमेकांना किस करतात. त्याचबरोबर हा दिवस खास बनवण्यासाठी ते एकमेकांना भेटवस्तूही देतात. किस डे हा व्हॅलेंटाईन आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस समजला जातो. बॉलिवूड चित्रपटामध्येही चुंबनाला प्राधान्य देऊन अनेक चित्रपट बनले. यातील शाहीद कपूर आणि कियारा अडवाणीचा कबीर सिंग हा चित्रपट आघाडीवर होता. हा चित्रपट पाहणे हे किस डेचे एक औचित्य असू शकेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
किसींग सीन्सचा भडीमार - शाहिद-कियारा यांच्या 'कबीर सिंह' चित्रपटात अनेक किसिंग सीन आहेत. या चित्रपटात शाहिद कपूर एका सर्जनच्या भूमिकेत दिसत आहे, ज्याचे हृदय तुटते आणि तो स्वतःला त्रास करुन घ्यायाला सुरुवात करतो. या चित्रपटातील शाहिदची आक्रमकता कथानकाला पुढे घेऊन जाते. कबीर सिंग हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरहिट चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी व्हर्जन आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वंगा यांनी केले आहे.
मूळ अर्जुन रेड्डी चित्रपटात विजय देवरकोंडाने केली होती शाहिदची भूमिका - शाहिद चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करताना दिसत आहे, तर कियारा प्रीतीच्या भूमिकेत परफेक्ट दिसली आहे. कियारालाही या चित्रपटात प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. शाहीद-कियारा यांचा 'कबीर सिंह' हा 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या साऊथ चित्रपट विजय देवरकोंडा यांचा तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा अधिकृत रिमेक आहे. दक्षिण आणि हिंदी दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे. साऊथचा 'अर्जुन रेड्डी' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चमकदार ठरला होता. शाहिद कियारा शिवाय या चित्रपट आदिल हुसैन, सोहम मुजूमदार, अर्जून बावजा, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता आणि कुणाल ठाकूर यांच्यादेखील भूमिका आहेत. शाहिदच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या सोहम मुजूमदार याचेही कौतुक झाले. यामध्ये त्याने शिवाची भूमिका साकारली आहे.
प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद - अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवणीच्या 'कबीर सिंह' चित्रपटाला देशभर भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाबाबत एक चकित करणारी बातमी पुढे आली ती म्हणजे, ए' सर्टिफिकेट असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी अल्पवयीन मुले आधार कार्डवर खोटी जन्म तारीख बनवण्यापर्यंत पोहोचली होती.
हेही वाचा - Big Boss 16 Winner Mc Stan : एमसी स्टॅन एकेकाळी रस्त्यावर झोपायचा, जाणून घ्या संपूर्ण प्रवास