ETV Bharat / entertainment

Shahid Kapoor and Shahrukh Khan : शाहरुख खानशी तुलना केल्यानं शाहिद कपूर झाला नाराज... - शाहरुख खान

shahid kapoor and shahrukh khan : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरनं शाहरुख खानशी स्वतःची तुलना करणे ही अत्यंत वाईट गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व असते, मला तुलना योग्य वाटत नाही असं त्यानं एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.

shahid kapoor and shahrukh khan
शाहिद कपूर आणि शाहरुख खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 6:20 PM IST

मुंबई - shahid kapoor and shahrukh khan : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे नाव आज टॉपच्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. शाहिद एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच चांगला डान्सर देखील आहे. जेव्हा त्याने 2003 मध्ये 'इश्क विश्क' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्याच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान काही वर्षापूर्वी शाहिद आणि शाहरुख खानची तुलना करण्यात आली होती. यावर आता शाहिदनं नाराजी व्यक्त केली आहे. शाहिद कपूरनं नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, लोक त्याला बॉलिवूडचा पुढचा शाहरुख खान म्हणायचे, पुढे त्यानं म्हटलं, 'माझी अनेकदा शाहरुखशी तुलना केली जात होती. ही खूप वाईट गोष्ट आहे. तुम्ही यशस्वी व्यक्तीसारखे असाल तर तुम्हीही यशस्वी व्हाल हा मूर्खपणाचा युक्तिवाद आहे, असंही त्यानं यावेळी म्हटलं.

शाहिद कपूर केली नाराजी व्यक्त : शाहिद कपूर पुढं सांगितलं, तुम्ही कुठेही तुलना करू शकत नाही. तुम्ही त्यांच्यासारखे आहात यावर अवलंबून, तुमचे भविष्यातील यश आहे. मी माझ्या आयुष्यात हा ऐकलेला मूर्खपणाचा युक्तिवाद आहे. जेंव्हा तुम्ही स्वतःसाठी अशी गोष्ट ऐकता तेव्हा तुम्हाला खूप दडपण येते. कारण तुलनेची ती अपेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत केली जात आहे. 'जर तुमची तुलना दुसऱ्याशी केली जात असेल तर हे योग्य नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचे खरे गुण विसरता. कधी कधी वाटतं मी किती मूर्ख आहे. अशा प्रकारे कोणाशीही तुलना करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.

शाहिद कपूर आणि शाहरुख खानबद्दल : शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आहेत. शाहिद कपूर शेवटचा फर्गीमध्ये दिसला होता. शाहरुख खानबद्दल बोलायचे झालं तर त्याला इंडस्ट्रीचा बादशाह म्हटले जाते. शाहरुखने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या शाहरुख खान त्याच्या 'जवान' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप यशस्वी ठरले आहे. 'पठाण' आणि 'जवान' सारखे ब्लॉकबस्टर दिल्यानंतर, शाहरुख आता डिसेंबर 2023 मध्ये 'डंकी' चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा :

  1. Mission Raniganj New Song : मिशन रानीगंज'मधील अक्षय कुमारनं शेअर केले 'जीतेंगे'चे मोशन पोस्टर; 'या' तारखेला रिलीज होणार गाणे...
  2. Actress Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरूप पोहचली मायदेशी; इस्रायलमध्ये अडकली होती
  3. Taapsee Pannu Angry On Paps: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू चिडली पापाराझीवर ; पहा व्हिडिओ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.