मुंबई - Dunki Movie : अभिनेता शाहरुख खानच्या सिनेसृष्टीतील सर्वोत्तम वर्ष 2023 ठरले आहे यात शंका नाही. वर्षाची सुरुवात 'पठाण' चित्रपटानं जबरदस्त कमाई करून केली. त्यानंतर रुपेरी पडद्यावर 'जवान' चित्रपटाचं आगमन झालं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमगिरी केली. 'पठाण' आणि 'जवान'नंतर शाहरुखचा तिसरा चित्रपट 'डंकी' या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा चित्रपट या दोन्ही चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. शाहरुख खान राजकुमार हिरानीबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. 'डंकी' चित्रपटाच्या एका गाण्याव्यतिरिक्त एक ड्रॉप व्हिडिओ आला आहे. आता प्रेक्षक ट्रेलरची वाट पाहत आहे.
'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर : 'डंकी'चा ट्रेलर 7 डिसेंबरला रिलीज होणार होता. आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 'डंकी' हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 120 कोटी रु. बजेटमध्ये पूर्ण झाला आहे. यात शाहरुख खान व्यतिरिक्त विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी, दिया मिर्झा आदी कलाकार दिसणार आहेत. 'डंकी' चं शूट 75 दिवसात पूर्ण झालंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'डंकी' चे हक्क 100 कोटींना विकले: मिळालेल्या माहितीनुसार 'डंकी'च्या नॉन-थिएटर हक्क हा 'जवान' सारख्याच किंमतीत विकला गेला आहे. 'डंकी'चे हक्क 100 कोटींना विकले गेल्याची चर्चा आहे. 'डंकी'कडून 'किंग खान'ला खूप अपेक्षा आहेत. राजकुमार हिरानीचा शेवटचा चित्रपट 'संजू' 2018 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटानं जवळपास 342.53 कोटींची कमाई केली होती. याशिवाय शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाप्रमाणेच 'डंकी' देखील कमाई करणार की नाही हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे. शाहरुखच्या 'जवान'ने रुपेरी पडद्यावर वादळ निर्माण केलं होतं. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता.
हेही वाचा :