ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan Tirupati : 'जवान' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान तिरुपती मंदिरात... - जवान

Shah Rukh Khan Tirupati : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख त्याची मुलगी सुहानासह तिरुपतीला दर्शनाला गेला.

Shah Rukh Khan Tirupati
शाहरुख खान तिरुपती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 12:51 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan Tirupati : शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. लोकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. 'जवान'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग पाहून असे वाटत आहे की हा चित्रपट जबरदस्त कमाई करणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान मुलगी सुहाना खान, नयनतारा आणि विघ्नेश शिवनसोबत तिरुपती श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहचला आहे. आता या मंदिरामधील व्हिडिओ हा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. शाहरुख खानच्या या व्हिडिओमध्ये तो दर्शन घेतल्यानंतर चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहे. 'जवान' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्याने प्रार्थना केली आहे.

शाहरुख खान पोहचला तिरुपतीला : शाहरुख खानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्याने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी सुहाना खान आणि नयनताराही पांढऱ्या सूटमध्ये होत्या. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण दर्शन घेताना दिसत आहे. शाहरुख खान हा 'जवान'चे ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी वैष्णोदेवीला देव दर्शन करण्यासाठी गेला होता. शाहरुख खानचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. शाहरुखला कोणी ओळखू नये म्हणून त्याने तोंड झाकले होते. यावेळी शाहरुखने डेनिम आणि टी-शर्टसोबत हुडी घातली होती. यासोबतच शाहरुखने आपले डोके हुडीने झाकले होते आणि मास्क देखील घातला होता. या लूकमध्ये तो खूप डॅशिंग दिसत होता.

या भाषांमध्ये होणार प्रदर्शित : 'जवान'बद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानसोबत या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर, योगी बाबू, सान्या मल्होत्रा ​​संजय दत्त आणि प्रियामणी दिसणार आहेत. 'जवान' चित्रपटाचे निर्माते गौरी खान आणि गौरव वर्मा आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एटली कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लाईक केल्या गेले आहे. 'जवान' चित्रपटामधील गाणे देखील खूप हिट झाले आहेत.

हेही वाचा :

  1. Nayanthara and vignesh shivan : नयनतारा पती विग्नेश शिवनचा संदेश पाहून झाली नाराज....
  2. Dono trailer out: 'दोनो' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित...
  3. Priyanka Chopra and Nick Jonas : प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर पती निक जोनाससोबत शेअर केले खास फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.