ETV Bharat / entertainment

शाहरुख खाननं नवीन ट्रॅकची झलक दाखवत 'डंकी' शीर्षकाचा अर्थ सांगितला - किंग खाननं डंकी शीर्षकाचा अर्थ सांगितला

Shah Rukh Khan Dunki Movie : 'डंकी'च्या शानदार ट्रेलरनंतर शाहरुख खाननं त्याच्या आगामी चित्रपटातील 'ओ माही' या नवीन ट्रॅकचा टीझर रिलीज केला आहे. यासोबतच त्यानं चाहत्यांना या चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थही सांगितलं आहे.

Shah Rukh Khan Dunki Movie
शाहरुख खानचा डंकी चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 1:51 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan Dunki Movie : अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या 'डंकी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहिला मिळत आहे. अनेकदा 'डंकी' चित्रपटामधील वेगवेगळ्या झलक शेअर केल्या गेल्या आहेत. नुकताच निर्मात्यांनी 'डंकी'चा ट्रेलर रिलीज केला होता आणि आता त्यांनी 'डंकी ड्रॉप 5'चा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाबाबत किंग खाननं सांगितले की, 'डंकी ड्रॉप 5' म्हणजेच 'ओ माही' हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे, जो एक प्रमोशनल व्हिडिओ आहे. याशिवाय शाहरुखनं 'डंकी' शब्दाचा अर्थही सांगितला आहे.

'डंकी'चा खरा अर्थ : शाहरुखनं एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं 'डंकी ड्रॉप 5'च्या 'ओ माही' गाण्याच्या व्हिडिओची झलक शेअर करत लिहिलं, ''प्रत्येकजण हे विचारत आहे 'डंकी'चा अर्थ काय आहे. 'डंकी'चा अर्थ आपल्या लोकांपासून वेगळं होणं, जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यासोबत असतात तेव्हा तुम्हाला वेळ संपू नये असं वाटतं''. किंग खाननं ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकजण त्याच्या पोस्टवर कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहिलं, ''डंकी चित्रपट रिलीज होताचं मी पाहणार आहे''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''किंग खानचा हा चित्रपट हिट होणार आहे''. त्यानंतर आणखी एकानं लिहिलं, ''या चित्रपटाला पाहण्यासाठी मी आता प्रतीक्षा करू शकत नाही''. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

'ओ माही'मध्ये शाहरुख खान आणि तापसी पन्नू दिसेल : 'ओ माही' हे गाणं शाहरुख खान आणि तापसी पन्नूवर चित्रित करण्यात आले आहे, जे खूपच रोमँटिक आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे की 'ओ माही' हे केवळ एक प्रमोशनल व्हर्जन आहे, ज्याचा चित्रपटाच्या कथेशी आणि त्याच्या आवृत्तीशी काहीही संबंध नाही. 'डंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख आणि तापसीशिवाय या चित्रपटात विकी कौशलचीही मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा :

  1. अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'खो गए हम कहाँ'चं ट्रेलर रिलीज
  2. सलमान खाननं वाचवलं होतं अनुष्का-विराटचं नातं ; जाणून घ्या या मागची कहाणी
  3. सबा आझादचा 'आय वान्ना सी यू डान्स'वर परफॉर्मन्स, हृतिक रोशननं केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.