ETV Bharat / entertainment

शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाची घोषणा, खलनायकाच्या भूमिकेत 'किंग खान'

author img

By

Published : Jun 3, 2022, 5:25 PM IST

'पठाण' आणि 'डंकी'नंतर शाहरुख खानने पुन्हा एकदा चाहत्यांना नवी भेट दिली आहे. खरंतर शाहरुख खानने या वर्षातील त्याच्या 'जवान' या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाची घोषणा
शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाची घोषणा

मुंबई - बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत सक्रिय झाला आहे. 2018 मध्ये 'झिरो' फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खानने 2022 मध्ये 'पठाण' आणि 'डंकी' चित्रपटांची घोषणा करून चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम केले. आता शाहरुखने चाहत्यांसाठी आणखी एक मोठी भेट आणली आहे. 'पठाण' आणि 'डंकी'नंतर शाहरुखने 3 जून रोजी तिसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'जवान' असे या चित्रपटाचे नाव असून तो दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली बनवणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख खानची धाडसी शैली पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी २ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. 'जवान' हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी, शाहरुख खानच्या होम प्रोडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेनमेंटने 3 जून रोजी एका पोस्टद्वारे सांगितले होते की तो एका नवीन चित्रपटाची घोषणा करणार आहे. यासोबतच नवीन चित्रपटाची घोषणा करण्याची वेळही दुपारी २ वाजताची असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले होते. त्यानुसार किंग खानने 'जवान'चा टीझर रिलीज केला आहे.

त्यानंतर शाहरुख दिसणार दुहेरी भूमिकेत - मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की शाहरुख खानचा डबल रोल 'जवान' या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका केल्या आहेत. अभिनेत्री नयनतारा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत.

शाहरुख खानकडे आधीच 'पठाण' आणि 'डंकी' सारखे मोठे चित्रपट आहेत. 'पठाण'बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

त्याचबरोबर शाहरुख खानने प्रसिद्ध आणि उत्तम चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत 'डंकी' चित्रपट साइन केला आहे. हा एक सोशल ड्रामा कॉमेडी चित्रपट असून, यात शाहरुख खान सरदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खाननेही राजकुमार हिराणीसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली.

हेही वाचा - Big B Jaya Wedding Anniv: लग्नाच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त बिग बींनी शेअर केले सुंदर फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.