मुंबई - Dhoom 4 : शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूप हिट ठरले आहे. चालू वर्षात शाहरुख खाननं 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 2023च्या आधीचा काळ हा 'किंग खान'साठी खूप कठीण होता. त्याचा 'फॅन', 'झीरो' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यानं 4 वर्षासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. 2024 वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. 2024 मधील मेगा बजेट चित्रपट 'धूम 4' या अॅक्शन चित्रपटामध्ये शाहरुख हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2023 मध्ये शाहरुख पहिल्यांदा 'पठाण' हा अॅक्शन चित्रपट केला होता. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
SRK in #Dhoom4 ,All Box Office Records will be shattered ❤️🔥
— Slayer (@Cricnerd36) December 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2024 Huge Announcement loading. pic.twitter.com/E8ZKLzRtQc
">SRK in #Dhoom4 ,All Box Office Records will be shattered ❤️🔥
— Slayer (@Cricnerd36) December 27, 2023
2024 Huge Announcement loading. pic.twitter.com/E8ZKLzRtQcSRK in #Dhoom4 ,All Box Office Records will be shattered ❤️🔥
— Slayer (@Cricnerd36) December 27, 2023
2024 Huge Announcement loading. pic.twitter.com/E8ZKLzRtQc
शाहरुख खान धूम ४ मध्ये? : शाहरुख खान, जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खानसोबत 'धूम 4' मध्ये अॅक्शन करताना दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये होत आहे. 'डॉन 3'च्या अपयशानंतर चाहते आता 'धूम 4' मध्ये शाहरुख खानची वाट पाहत आहेत. 'धूम 4'ची चर्चा खूप दिवसांपासून होत असली तरी यशराज बॅनरने अद्याप या अॅक्शन फ्रँचायझीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा 'धूम 4'मध्ये शाहरुख खानच्या उपस्थितीची पुष्टीही केलेली नाही. 'धूम 4' चे नावच ऐकायला मिळत आहे, मात्र अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही चित्रपटाचा अद्याप पत्ता नाही.
-
This is crazy news 🤯#ShahRukhKhan in #Dhoom4 ...
— Hardy (@warakas47) December 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Now it's an open invitation for clash @hombalefilms (G main dam hai)
Action vs Action pic.twitter.com/ujIjVpvhHh
">This is crazy news 🤯#ShahRukhKhan in #Dhoom4 ...
— Hardy (@warakas47) December 27, 2023
Now it's an open invitation for clash @hombalefilms (G main dam hai)
Action vs Action pic.twitter.com/ujIjVpvhHhThis is crazy news 🤯#ShahRukhKhan in #Dhoom4 ...
— Hardy (@warakas47) December 27, 2023
Now it's an open invitation for clash @hombalefilms (G main dam hai)
Action vs Action pic.twitter.com/ujIjVpvhHh
'धूम 4 ' चित्रपट : 'धूम 4' या चित्रपटाची चर्चा होत असली तरी यशराज बॅनरनं अद्याप या अॅक्शन फ्रँचायझीवर कोणतीही माहिती दिलेली नाही. 'धूम 4' मध्ये शाहरुख खान असणार याबद्दल यशराज बॅनर कुठलीही माहिती शेअर केलेली नाही. 'धूम' फ्रँचायझी ही प्रचंड हिट झाली आहे. 'धूम' हा चित्रपट २७ ऑगस्ट, २००४ रोजी रुपेरी पडद्यावर आला होता. या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत जॉन अब्राहम दिसला होता, तर अभिषेक बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर 'धूम 2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2006 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत हृतिक रोशन होता. त्यानंतर 'धूम 3' हा 20 डिसेंबर 2013 रोजी रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत होता.
हेही वाचा :